आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Photo : बाळाला घरी घेऊन आले शाहीद आणि मीरा, आजी आजोबाही पोहोचले भेटायला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - शाहीद कपूर आणि मीरा राजपूत पुन्हा एकदा मम्मी-प्पा बनले आहेत. 5 सप्टेंबरला मीराने मुलाला जन्म दिला. शुक्रवारी मीरा नव्या बाळासह घरी आली. हॉस्पिटलबाहेर बाळ मीराबरोबर दिसून आले. सोबत शाहीद आणि मीशाही होते. मीशा शाहीदच्या कडेवर होती. जन्माच्या दोन दिवसांनंतरच शाहीद-मीरा यांनी मुलाचे नाव झैन असे ठेवले आहे. शाहीदने ट्वीट करत ही माहिती दिली होती. आमचे कुटुंब आता पूर्ण झाले आहे असे शाहीदने पोस्ट केले होते. 


24 वर्षांची झाली मीरा 
- शाहीदची पत्नी मीरा राजपूत शुक्रवारीच 24 वर्षांची झाली. शाहीदने हॉल्पिटलमध्येच तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. मुलाच्या जन्मामुळे शाहीदसाठी ही डबल सेलिब्रेशनची संधी ठरली. 
- लग्नाच्या तीन वर्षांनंतर मीरा दोन मुलांची आई बनली आहे. तिची मुलगी मीशाचा जन्म 26 ऑगस्ट 2016 रोजी झाला होता. तर मुलाचा जन्म 5 सप्टेंबर 2018 रोजी झाली. 
- शाहीदने मुलाचे नाव झैन ठेवले आहे. हा एक अरेबिक शब्द असून याचा अर्थ सुंदर असा होतो. 


नातवाला भेटायला पोहोचल्या आजीबाई.. 
मीरा मुलाला घेऊन घरी पोहोचल्यानंतर आजी सुप्रिया पाठकही मुलाला भेटण्यासाठी घरी पोहोचली. पती पंकज कपूर आणि मुलगी शना यांच्याबरोबर सुप्रिया दिसल्या. तसेच शाहीदची आई नीलिमा आजीम आणि ईशान खट्टरही याठिकाणी स्पॉट झाले. 

बातम्या आणखी आहेत...