आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद कपूरचा खुलासा, तीन वर्षे आईला विनंती केली तेव्हा झाला ईशानचा जन्म 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. करण जोहरचा प्रसिध्द चॅट शो 'कॉफी विद करण'मध्ये गेल्या रविवारी शाहिद कपूर आपला भाऊ ईशान खट्टरसोबत पोहोचला. शोदरम्यान शाहिद आणि ईशानने आपल्या पर्सनल आयुष्यातील अनेक रहस्य उलगडले. शाहिद कपूरने सांगितले की, त्याने 3 वर्षे आईला रिक्वेस्ट केली तेव्हा ईशानचा जन्म झाला. 

 

मी आईला म्हणालो - मलाही भाऊ-बहीण असण्याचा हक्क आहे
शोदरम्यान करण जोहरने शाहिद कपूरला प्रश्न विचारला की, त्याने आपले कुटूंब कसे मॅनेज केले आणि पालकांचे नाते मोडल्यानंतरही त्याचे कुटूंब आज आनंदी आहे. याचे उत्तर देताना शाहिदने सांगितले की, "मी ईशानसाठी आईला खुप त्रास दिला होता. आईने दूसरे लग्न केले होते, तेव्हा तिला दूसरे मुलं नको हे तिच्या डोक्यात क्लिअर होते. आईला वाटत होते की, दूस-या बाळासाठी आता खुप उशीर झाला आहे. पण मला हे नेहमी चुकीचे वाटायचे, मलाही भाऊ-बहीण असण्याचा हक्क होता. मी जवळपास 3 वर्षे आईला ईशानसाठी खुप रिक्वेस्ट केली. यानंतर अखेर एक दिवस ती मला म्हणाली की, 'ठीक आहे आता अजून एक येणार आहे."

 

शाहिद-ईशानमध्ये आहे चांगली बॉन्डिंग
शाहिद कपूर आणि ईशान खट्टरमध्ये खुप चांगली बॉन्डिंग आहे. या दोघांमध्ये खरेतर 14 वर्षांचे अंतर आहे. शाहिदचा जन्म 25 फेब्रुवरी, 1981 मध्ये आणि ईशानचा जन्म 1 नोव्हेंबर 1995 मध्ये झाला. ईशान हा शाहिदचा सावत्र भाऊ आहे. ईशानने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. 

 

शाहिदची मुलगी मीशा आणि ईशानचीही आहे चांगली बॉन्डिंग 
ईशान प्रत्येक सुख-दुःखात शाहिद-मीराला साथ देतो. काही वर्षांपुर्वी मीराला बाळ झाले होते तेव्हा ईशान हॉस्पिटलमध्ये हजर होता. शाहिदची मुलगी मीशासोबतही ईशानची चांगली बॉन्डिंग आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोजवर ईशान आणि मीरा नेहमीच कमेंट करत असतात. मीरा अनेक वेळा फोटो शेअर करते तेव्हा सांगते की, हा फोटो ईशानने शेअर केला आहे. मीरा अनेक वेळा ईशानसोबत सेल्फी शेअर करत असते. या दोघांमध्येही चांगली बॉन्डिंग आहे. 

बातम्या आणखी आहेत...