आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः चंडीगडमध्ये ‘जर्सी’ चित्रपटाचे शूटिंग करणारा अभिनेता शाहिद कपूर गंभीर जखमी झाला आहे. शूटच्या दरम्यान वेगवान बॉलचा शिकार झालेल्या शाहिदला 13 टाके पडल्याचे सांगण्यात येत आहे. इंग्रजी वेबसाइट पिंकविलाच्या वृत्तानुसार, अपघाताची बातमी समजताच शाहिदची पत्नी मीरा कपूर चंदीगडला रवाना झाली आहे.
रिपोर्ट्सनुसार, वेगवान बॉलने जोरदार धडक दिल्यानंतर शाहिदचा खालचा ओठ पूर्ण फाटला आहे. याशिवाय त्याच्या हनुवटीवर सूज आली आहे. असे म्हटले जात आहे की, शाहिद सूज असेपर्यंत शूटिंग करु शकणार नाही. चित्रपटात पंकज कपूर त्याच्या मेंटॉरची भूमिका साकारत आहे.
डिसेंबर 2019 मध्येही शाहिद आजारी पडला होता. त्यावेळीदेखील शाहिदची तब्येत बिघडल्यामुळे शूटिंग बर्याच काळासाठी लांबणीवर पडले होते. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्ननुरी आणि निर्माता अमन गिल यांनी शाहिदचे कामातील समर्पणासाठी यापूर्वीच कौतुक केले आहे.
'कबीर खान'च्या दमदार यशानंतर शाहिद कपूर 'जर्सी'च्या शूटिंगसाठी बरीच मेहनत घेत आहे. नुकतेच याचे एक उदाहरण पाहायला मिळाले होते. जर्सीचे शूटिंग चंदिगडमध्ये सुरू होते. तेथे कडाक्याची थंडी पडली होती. तरीदेखील शाहिदने शूटिंग पूर्ण केले, शूटिंगविषयी काहीच तक्रार केली नाही. दिग्दर्शक गौतम तिन्ननुरी शाहिदचे कौतुक करत म्हणाले होते, शाहिद खूपच प्रोफेशनल आहे. डिसेंबरच्या महिन्यात बरेच शूटिंग बाहेर करण्यात आले. काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडली होती. आम्ही तीन ते चार कपडे घालत होतो, मात्र शाहिदने इतक्या थंड वातावरणात आपले शूटिंग पूर्ण केले. कामाला 100 टक्के दिले. आवडते काम असेल तर कोणत्याही अडचणीवर मात करता येते हे त्याने दाखवून दिले. निर्माते अमन गिल म्हणाले होते, थंडी वाढल्याचे सर्वांनाच कळाले होते. कारण रात्री तापमान 2 डिग्रीपर्यंत जायचे. मात्र शाहिदचा आपल्या कामावर फोकस होता. त्याने स्वत:ला आणि टीमलाही त्रास होऊ िदला नाही. एका प्रोफेशनल कलाकाराप्रमाणे त्याने काम सांभाळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.