आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या काळजीपोटी चित्रपटाच्या प्रमोशनपासून दूर राहतोय शाहिद, कुटूंबाला देतोय वेळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: शाहिद कपूरच्या 'बत्ती गुल मीटर चालू'चे प्रमोशन सध्या सुरु आहे. परंतू शाहिद सध्या चित्रपटाच्या प्रमोशनपासून दूर आहे. यामागचे कारण म्हणजे त्याची 2 वर्षांची मुलगी मीशा आहे. मीशा गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. मुलीची काळजी घेण्यासाठी त्याने चित्रपटाचे प्रमोशन टाळले आहे. आजच्या काळात चित्रपटाचे यश हे पुर्णतः प्रमोशनवर अवलंबून असते. परंतू शाहिदने करिअरपेक्षा जास्त महत्त्व कुटूंबाला दिले आहे. कारण मीरा राजपूतने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला. मीरा सध्या त्या बाळामध्ये व्यस्त आहे. यामुळे ती मीशावर लक्ष देऊ शकत नाहीये. 


मुलीसाठी रात्ररात्र जागतोय शाहिद 
- शाहिद कपूरची मुलगी मीशा गेल्या काही काळापासून आजारी आहे. मुलीची काळजी घेण्यासाठी शाहिद गेल्या 34 तासांपासून झोपलेला नाही.
- शाहिदने कौंटुबिक जीवनासाठी प्रोफेशनल लाइफपासून थोडा दूर राहतोय.
- शाहिद कपूरचा आगामी चित्रपट 'बत्ती गुल मीटर चालू' 21 सप्टेंबरला रिलीज होत आहे. चित्रपटामध्ये शाहिदसोबत श्रध्दा कपूर आणि यामी गौतम स्क्रीन शेअर करणार आहेत. चित्रपटाचे डायरेक्टर नारायण सिंह आहेत. 
- 'बत्ती गुल मीटर चालू'च्या रिलीजनंतर शाहिद तेलुगु चित्रपट 'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रीमेकची शूटिंग सुरु करणार आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर संदीप वांगा आहेत.
 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...