Home | News | Shahid Kapoor Son First Closeup Photo Going Viral

शाहिद कपूरच्या मुलाचा First Photo आई मीराने केला शेअर, कॅप्शन दिले - 'हॅलो वर्ल्ड'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:39 PM IST

24 वाढदिवसाच्या 2 दिवसांपुर्वीच दुस-यांदा आई झाली होती मीरा

 • Shahid Kapoor Son First Closeup Photo Going Viral

  मुंबई. शाहिद कपूरचा मुलगा झेनचा पहिला क्लोजअप फोटो समोर आला आहे. हा फोटो स्वतः शाहिदची पत्नी मीराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये झेन मरुन कलरच्या शर्टमध्ये दिसतोय. मीराने फोटोला 'हॅलो वर्ल्ड' असे कॅप्शन दिले आहे. दोन महिन्याचा झेनचा एक फोटो काही दिवसांपुर्वी समोर आला होता. यामध्ये तो पाळण्यामध्ये दिसत होता. पण त्याचा चेहरा यामध्ये दिसत नव्हता. मीराने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये सांगितले होते की, झेन दीदी मिशाचा पाळणा वापरत आहे.


  सोशल मीडियावर यूजर्स म्हणाले - शाहिद कपूरची कार्बन कॉपी
  - झेनचा क्लोजअप फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अवघ्या 11 तासांमध्ये या फोटोशाल इंस्टाग्रामवर साडे तीन लाखांपेक्षा लोकांनी पाहिले आहे. सोशल मीडिया यूजर्स फोटोवर आपापली प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक म्हणत आहेत की, झेन मीरासारखा आहे, तर काही लोक शाहिदसोबत त्याची तुलना करत आहेत. एका यूजरने लिहिले, "शाहिद कपूरची कार्बन कॉपी झेन" तर एका यूजरने लिहिले, "हुबेहूब तुझ्यासारखा आहे मीरा, खुप आशिर्वाद आणि शुभेच्छा." एक यूजर म्हणतो की, झेनचे नाक सेम मीराप्रमाणे आहे. तर एक यूजरने कमेंट केली आहे की, "जैसी मां, वैसा बेटा, जैसा बाप वैसी बेटी"

  24 व्या वाढदिवसाच्या दोन दिवसांपुर्वीच बनली आई
  - झेनचा जन्म 5 सप्टेंबरला मीराच्या 24 व्या वाढदिवसाच्या दोन दिवसांपुर्वीच झाला होता. याच्या दोन वर्षांपुर्वी 26 ऑगस्ट 2016 ला तिने मुलगी मीशाला जन्म दिला होता. जुलै 2015 मध्ये मीराने शाहिद कपूरसोबत लग्न केले होते. एका मुलाखतीत शाहिदने खुलासा केला होता की, मीराने शाहिदसोबत लग्न करण्यापुर्वी एक अट ठेवली होती. यामध्ये ती म्हणाली होती की, जर तुझे केस पहिल्यासारखे केले तरच मी तुझ्याशी लग्न करेल. 'उडता पंजाब' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती. तेव्हा शाहिदचे केस खुप मोठे होते. मीराला शाहिदचे लहान केस आवडत होते. लग्नावेळी शाहिद 34 वर्षांचा होता तर मीरा 21 वर्षांची होती. म्हणजे मीरा शाहिदपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे.

Trending