आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahid Kapoor Starts Shooting Of Film 'Jersey' In Chandigarh, Shared A Photo On Instagram

शाहिद कपूरने चंदीगडमध्ये सुरु केले 'जर्सी' चित्रपटाचे शूटिंग, इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बिघडलेल्या तब्येतीचा सामना करत शाहिद कपूर पुन्हा सेटवर परतला आहे. शाहिदने चित्रपटाच्या पूर्ण टीमसोबत 'जर्सी' साठी चंदीगडमध्ये शूटिंग सुरु केले आहे. 'जर्सी' तेलगु चित्रपटाचा रिमेक आहे ज्याचे सर्व चित्रपट समीक्षकांनी खूप कौतुक केले होते. चित्रपटात शाहिदव्यतिरिक्त त्याचे पिता पंकज कपूर, मृणाल ठाकुर हेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

एका फिल्ड क्रिकेटरच्या यशस्वी होण्याची कथा 'जर्सी' पुढच्यावर्षी 28 ऑगस्ट मोठ्या पडद्यावर येणार आहे. 2019 चा दुसरा सर्वात मोठा हिट 'कबीर सिंह' देणारा शाहिद कपूर चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. तसेच त्याचे पिता पंकज कपूर चित्रपटात त्याच्या मेंटरची भूमिका साकारताना दिसणार आहेत. विशेष गोष्ट ही आहे की, तेलगु व्हर्जन बनवणारे गौतम तिन्नानौरी या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.  शाहिद कपूरला कास्ट करण्याबद्दल गौतम म्हणाला, "माझा चित्रपट 'जर्सी' हिंदीमध्येही बनवणे आणि नॅशनल ऑडियन्सपर्यंत घेऊन जाण्याची माझी इच्छा होती. हिंदी प्रेक्षकांपर्यंत याला पोहोचवण्यासाठी शाहिद कपूरपेक्षा उत्तम पर्याय नव्हता." 'जर्सी' चे हिंदी व्हर्जन अल्लु अरविंद, अमन गिल, दिल राजू प्रोड्यूस करत आहे.