आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा झालेल्या शाहिदला सोनमने दिल्या शुभेच्छा, उत्तर देताना शाहिदने विचारला असा प्रश्न की, सोनमची बोलती झाली बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत पुन्हा एकदा आईबाबा झाले आहेत. मीरा राजपूतने 5 सप्टेंबर रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. ती आता आपल्या नवजात बाळाला घेऊन घरी आली आहे. शाहिद-मीराने आपल्या मुलाचे नाव झैन असे ठेवले आहे. शाहिद दुस-यांदा बाबा झाल्यानंतर बॉलिवूडकरांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 'मौसम'मध्ये शाहिदची को-स्टार राहिलेल्या सोनम कपूरने ट्वीट करुन बाबा झालेल्या शाहिदला शुभेच्छा दिल्या. यावर शाहिदने सोनमला अतिशय खासगी प्रश्न विचारला ज्यामुळे तिची बोलतीच बंद झाली. सोनमने शाहिदच्या ट्वीटचे उत्तर दिले नाही. 


शाहिदने विचारला होता हा प्रश्न... 

- शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांना शुभेच्छा देताना सोनमने ट्वीटरवर लिहिले, 'शाहिद आणि मीराला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या कुटुंबात नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. मीशाला तिचा लहान भाऊ मिळाला आहे, ज्याच्यासोबत ती आता खेळू शकेल.'

 

- सोनमच्या या ट्वीटनंतर शाहिदने ट्वीट करुन तू गोड बातमी कधी देणार, असा प्रश्न सोनमला विचारला. सोनमने अद्याप शाहिदच्या या ट्वीटचे काहीच उत्तर दिलेले नाही. सोनम कपूरने याचवर्षी मे महिन्यात दिल्लीचा बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले. 

 

- शाहिदने सोनमला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराची आता तिचे फॅन्स नक्कीच वाट बघत असणार. 

 

पूर्ण झाले मुलाचे कुटुंब...
शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम यांनी आपला आनंद व्यक्त करताना म्हटले होते की, मी खूप आनंदी आहे. शाहिद आणि मीराचे कुटुंब पूर्ण झाले आहे. वडील पंकज कपूरने म्हटले 'आमच्या कुटुंबासाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. शाहिदचे कुटुंब पूर्ण झाले आहे. कुटुंबात नवीन पाहुण्याच्या आगमनामुळे आम्ही खूप एक्साइटेड आहोत.' 

 

- शाहिद कपूरच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाल्या, त्याचा आगामी चित्रपट 'बत्ती गुल मीटर चालू' हा आहे. दिग्दर्शक नारायण सिंह यांच्या या चित्रपटात शाहिदसोबत श्रद्धा कपूर, यामी गौतम  मेन लीडमध्ये आहेत. येत्या 21 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...