आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 3 वर्षांत दोन मुले, तरीही अगदी फिट आहे शाहिदची पत्नी मीरा, पहिल्या मुलीच्या जन्मानंतर 3 महिन्यांतच परतली होती शेपमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतचा आज वाढदिवस असून तिने वयाची 24 वर्षे पूर्ण केली आहेत. 7 सप्टेंबर 1994 रोजी जन्मलेल्या मीराने दोन दिवसांपूर्वीच म्हणजे 5 सप्टेंबर रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. हे शाहिद आणि मीराचे दुसरे अपत्य आहे. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव मीशा आहे. तिचा जन्म 26 ऑगस्ट 2016 रोजी झाला. मीरा आणि शाहिदचे लग्न 7 जुलै 2015 रोजी झाले होते. लग्नाच्या अवघ्या तीन वर्षांत मीरा दोन मुलांची आई झआली आहे. प्रेग्नेंसीच्या काळात मीराने आपल्या फिटनेवर विशेष लक्ष दिले होते. 


शाहिद स्वतः ठेवतो मीराचा फिटनेसकडे लक्ष...  

शाहिद कपूर स्वतः पत्नी मीराच्या फिटनेसकडे जातीने लक्ष देतो. लग्नानंतर शाहिद मीराला स्वतःबरोबर जीममध्ये घेऊन जात होता. पहिल्या प्रेग्नेंसीच्या काळात मीराचे योगा आणि जीम करतानाचे फोटो शाहिदने शेअर केले होते. मुलगी मीशाच्या जन्माच्या तीन महिन्यांतच मीरा अगदी फिट झाली होती. हे दोघे करण जोहरच्या 'काफी विद करन' या टॉक शोमध्येही झळकले होते. सेकंड प्रेग्नेंसीच्या काळातही मीरा लाइट वर्कआउट आणि हेल्दी डाएट घ्यायची. 

 

खास प्रकारच्या सलादने स्वतःला फिट ठेवते मीरा... 
काही दिवसांपूर्वी मीरा राजपूतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे फिटनेस सिक्रेट शेअर केले होते. त्यात तिने सांगितले होते, की ती कधीही जेवणात सलाद खायला विसरत नाही. मीराने सांगितल्यानुसार, जेव्हाही वेळ मिळतो, तेव्हा ती स्वतः सलाद तयार करते. इतकेच नाही तर बीटच्या पानांचा वापरदेखील मीरा सलादमध्ये करते. याशिवाय हिरवी मिरची, इटालियन चीज आणि लसून पेस्ट टाकते. सोबतच स्ट्रॉबेरीचाही वापर करते. 

 

अमीनो सॉस आणि सोया फूड घेते मीरा...
मीरा भाजीत अमीनो सॉसचा वापर करते. अमीनो सॉस व्हेजिटेरियन फूड पसंत करणा-यांमध्ये लोकप्रिय आहे. हे वजन कंट्रोल ठेवण्यात मदत करते. अमीनो सॉसप्रमाणेच अमीनो एसिड असते, जे शरीरातील प्रोटीनची गरज पूर्ण करते. याशिवया मीरा सोया फूड घेते, यामध्ये आठ प्रकारचे अमीनो एसिड असतात.  कॅल्शियम, आयरन, मिनरल्सशिवाय मॅगनीज, सेलेनियम आणि फॉस्फरस असते.  

बातम्या आणखी आहेत...