आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahid Kapoor Wife Mira Rajput Share Daughter Misha Playing With 2 Month Old Brother Zain

First Photo: शाहिद कपूरच्या पत्नीने शेअर केला 2 महिन्यांच्या मुलाचा पहिला फोटो, मीशासोबत खेळताना दिसला चिमुकला झैन कपूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने पहिल्यांचा त्यांचा दोन महिन्यांचा मुलगा झैन कपूरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत शाहिद-मीराची दोन वर्षांची चिमुकली मीशा तिचा धाकटा भाऊ झैनसोबत खेळताना दिसतेय. मीरने तिच्या मागील इंस्टाग्राम स्टोरीत सांगितले होते की, ती झैनसाठी मीशाचा पाळणा वापरत आहे.  शाहिदसोबत जुलै 2016 मध्ये लग्नगाठीत अडकणा-या मीराने दोन महिन्यांपूर्वी म्हणजे 5 सप्टेंबर रोजी मुलगा झैनला जन्म दिला.

 

मुलांसाठी शाहिद-मीराने ठेवली नाही आया... 
- शाहिदने एका मुलाखतीत सांगितले होते, "सध्याच्या काळात कपल आपल्या मुलांच्या देखभालीसाठी आया किंवा मेड्स ठेवतात, पण याचा वाईट परिणाम म्हणजे मुले त्यांच्या आईवडिलांऐवजी आयासोंबत जास्त कनेक्ट होतात. माझ्या मुलांच्या बाबतीत असे घडू नये, म्हणून आम्ही आया ठेवलेली नाही."
- "मी माझ्या मुलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत असतो. मग त्यासाठी झोप बाजुला ठेवावी लागली तरी मला चालते. हे सर्व मी बालपणी शिकलोय. माझे आजोबा मला रोज शाळेत सोडायला यायचे. ते आजारी असतानादेखील त्यांनी त्यांचा हा नित्यक्रम कधी सोडला नव्हता." 
- मुलाच्या नावाविषयी शाहिदने सांगितले होते, "मुलीचे नाव मीरा आणि माझ्या नावातील पहिल्या अक्षरावरुन (मीशा) ठेवले आहे. तर मुलाचे नाव झैन ठेवण्यामागे एक लॉजिक हे आहे की, आम्ही आधीच ठरवले होते, मुलगी झाली तर तिचे नाव मीशा आणि मुलगा झाला तर त्याचे नाव झैन ठेवले जाईल.' 
- शाहिद अखेरचा मोठ्या पडद्यावर 'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटात झळकला होता. आता लवकरच तो कबीर सिंहच्या आगामी चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट अर्जुन रेड्डी या तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक असेल. यात शाहिदसोबत कियारा अडवाणी मेन लीडमध्ये झळकणार आहे. 

 

मीराला रॉकस्टार म्हणते शाहिदची आई...
- शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम नातवाच्या जन्मानंतर अतिशय आनंदी आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, आम्ही बाळाच्या बारशाचा कार्यक्रम करणार नाही, कारण शाहिद आणि मीरा यांचा यावर विश्वास नाही. 
- नीलिमा यांनी पुढे सांगितले होते की, नातवाच्या आगमनाच्या आनंदात एक फंक्शन नक्की होईल. सून मीराचे कौतुक करताना नीलिमा यांनी तिला रॉकस्टार सून म्हटले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...