Home | News | Shahid Kapoor Wife Mira Rajput Trolled For Skin Transformation Ad:

शाहिद कपूरची पत्नी मीराने अँटी-एजिंग क्रीममधून केला अॅक्टिंग डेब्यू, यूजर्स म्हणाले - करीनाला कॉपी करणे बंद कर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 07, 2018, 05:32 PM IST

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने अखेर अॅक्टिंग वर्ल्डमध्ये पदार्पण केले आहे. ती लवकरच आई होणार आहे.

 • Shahid Kapoor Wife Mira Rajput Trolled For Skin Transformation Ad:

  मुंबई: शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने अखेर अॅक्टिंग वर्ल्डमध्ये पदार्पण केले आहे. ती लवकरच आई होणार आहे. तिने पहिली जाहिरात ही अँटीएजिंग क्रीमसाठी केली आहे. ही जाहिरात रिलीज होताच ट्रोलर्सने मीरावर निशाना साधला आहे. सोशल मीडिया यूजर्स म्हणत आहेत की, ज्या अँटी-एजिंग क्रिमची जाहिरात करताना मीरा क्रिमचे गोडवे गात आहे. ती क्रिम मुळात तिच्यासाठी नाहीच, कारण मीरा अजून वयाने खुप लहान आहे. ती तरुण आहे. तर काही यूजर्स तिला ट्रोल करत म्हणत आहेत की, मीरा करीना कपूरला कॉपी करतेय.


  सोशल मीडियावर येत आहेत असे कमेंट्स
  - एका यूजरने लिहिले - "मीरा अवघ्या 23 वर्षांची आहे. मला नाही वाटत की, तिला ओलेची गरज आहे." तर एका यूजरने लिहिले "मला कळत नाहीये की, मीरा आपली लिमिट क्रॉस करु शकते. मीराला फक्त लाइमलाइटमध्ये राहायचे आहे. पहिले स्वतःच म्हणायची की, जसे आहात तसे राहा आणि आता दूस-यांना कॉपी करतेय."
  - सोशल मीडियावर यूजरने लिहिले, करीनाला कॉपी करणे बंद कर. पहिल्यांदा प्रेग्नेंट होती तेव्हा जाहिरात करण्याची ही आयडिया कुठे होती. आता करीनाला कॉपी करुन तु करीना नाही बनू शकत.
  - Moniishaabhagat01 नावाच्या एका यूजरने लिहिले - "मीरा पहिले तुझ्या चेह-याचा नॉर्मल फोटो टाक, नंतर 28 दिवस चॅलेंज घेऊन दोन्ही फोटो मॅच करत. मला नाही वाटत की, रिजल्ट काही वेगळा येईल. ही जाहिरात फेक आणि हॉरिबल आहे."

  शाहिदने केली पत्नीची स्तुती
  - मीराने इंस्टाग्रामवर आपली डेब्यू अॅड शेअर केली. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, आई होण्याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही स्वतःला विसरावे. मी ओलेची 28 डेज वाली स्किन ट्रान्सफॉर्मेशन टॅलेंज घेतले. ही माझी रिबोर्न स्टोरी आहे आणि तुमची काय आहे?
  - जाहिरातीत मीराने सांगितले की, आई बनल्यानंतर आणि पोस्ट प्रेग्नेंसीनंतर महिला आपला ग्लो गमावतात. नंतर ती प्रोडक्ट इंट्रोड्यूज करते आणि मीशाच्या जन्मानंतरची ट्रान्सफॉर्मेशनची स्टोरी सांगते.
  मीराच्या या जाहिरातीची पती शाहिदने स्तुती केली आहे. त्याने कमेंट करत लिहिले की, "Who's this stunner..."।

  शाहिदपेक्षा 13 वर्षे लहान आहे मीरा
  - दिल्लीमध्ये राहणा-या मीरा राजपूतने जुलै 2015 मध्ये शाहिद कपूरसोबत लग्न केले होते. दोघांच्या वयामध्ये 13 वर्षांचे अंतर आहे. सुरुवातीला मीरा शाहिदसोबत लग्न करण्यास तयार नव्हती. कारण शाहिद तिच्यापेक्षा खुप मोठा होता.
  - शाहिद लग्नाच्या वेळी 34 वर्षांचा होता तर मीरा अवघ्या 21 वर्षांची होती. शाहिदशी लग्न केले तेव्हा मीरा लेडी श्रीराम कॉलेज, नवी दिल्लीमध्ये थर्ड ईयरची विद्यार्थिनी होती.
  - लग्नानंतर 22 व्या वर्षी मीराने मुलगी मीशाला जन्म दिला. आता मीरा पुन्हा एकदा प्रेग्नेंट आहे.


  पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा मीरा राजपूतच्या जाहिरातीवर येत असलेल्या कमेंट्स...

 • Shahid Kapoor Wife Mira Rajput Trolled For Skin Transformation Ad:
 • Shahid Kapoor Wife Mira Rajput Trolled For Skin Transformation Ad:
 • Shahid Kapoor Wife Mira Rajput Trolled For Skin Transformation Ad:
 • Shahid Kapoor Wife Mira Rajput Trolled For Skin Transformation Ad:
 • Shahid Kapoor Wife Mira Rajput Trolled For Skin Transformation Ad:

Trending