Home | Gossip | Shahid Kapoor will raise fees after the release of Kabir Singh, could take 35 crores for a movie!

'कबीर सिंह' च्या सक्सेसनंतर शाहिद कपूर वाढवणार फी, एका चित्रपटासाठी चार्ज करणार 35 कोटी !

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 10, 2019, 05:33 PM IST

शाहिदच्या करियरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट 

 • Shahid Kapoor will raise fees after the release of Kabir Singh, could take 35 crores for a movie!

  बॉलिवूड डेस्क : चित्रपट 'कबीर सिंह'च्या जबरदस्त सक्सेसने शाहिद कपूर खूप खुश आहे. कमाईच्या बाबतीत शाहिदच्या या चित्रपटाने शाहरुख खानचा 'रईस', सलमान खानचा 'रेस 3' आणि राजनीकांत यांच्या '2.0' या चित्रपटांनाही पछाडले. त्यामुळेच मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, शाहिद आता आपली फी वाढवण्याचा विचार करत आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, शाहिद आता एका चित्रपटासाठी सुमारे 35 कोटी रुपये घेण्याचा विचार करत आहे. आतापर्यंत तो एका चित्रपटासाठी 10 -15 कोटी रुपये फी घेत होता.

  243 कोटींपेक्षा जास्त झाले आहे चित्रपटाचे कलेक्शन...
  21 जूनला रिलीज झालेला चित्रपट 'कबीर सिंह' ने 19 दिवसांमध्ये इंडियन बॉक्सऑफिसवर 243.17 कोटींचा आकडा पार केला आहे. याव्यतिरिक्त हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या चित्रपटाने 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' ला 11 व्या क्रमांकावर ढकलले आहे.

  शाहिदच्या करियरमधील सर्वात मोठी हिट...
  चित्रपट 'कबीर सिंह' शाहिद च्या करियरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. हा त्याच्या करियरमधील पहिला सोलो हिटदेखील आहे. चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादासाठी शाहिदने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून प्रेक्षकांचे आभारही मानले होते. त्याने लिहिले होते, "तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आभार मानायला शब्द कमी आहेत. 'कबीर सिंह'ला मनापासून समजून घेण्यासाठी, माफ करण्यासाठी आणि प्रेम करण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आपण सर्वांनी आपल्या चुकांमधून शिकत शिकत पुढे जायला हवे जेणेकरून आपण सुधारू शकू, दयाळू आणि चतुर बनू शकू. त्याच्यामध्ये (कबीर) उणिवा होत्या आणि त्या सर्वांमध्ये आहेत. तुम्ही त्याला जज नाही तर त्याला अनुभवले, त्याला समजून घेतले यासाठी मी तुमचे जेवढे आभार मानेन तेवढे कमीच आहे."

 • Shahid Kapoor will raise fees after the release of Kabir Singh, could take 35 crores for a movie!
 • Shahid Kapoor will raise fees after the release of Kabir Singh, could take 35 crores for a movie!

Trending