आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : शाहिद कपूर सध्या आपला आगामी चित्रपट 'बत्ती गुल मीटर चालू'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यानंतर ऑक्टोबरमध्ये तो तेलुगु चित्रपट 'अर्जुन रेड्डी'च्या अधिकृत हिंदी रिमेकवर काम सुरू करेल. या चित्रपटासाठी त्याला आपली दाढी आणि केस वाढवावे लागतील...
शाहिद कपूर हिट तेलुगु चित्रपट 'अर्जुन रेड्डी'च्या अधिकृत हिंदी रिमेकमध्ये काम करणार असल्याचे समजले तेव्हापासून हा चित्रपट फ्लोअरवर येण्याची प्रतीक्षा केली जात आहे. काही वृत्तानुसार शाहिद या चित्रपटाची शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरू करणार होता. आता असे ऐकण्यात आले आहे की, ही शूटिंग तो आणखी दोन आठवडे पुढे ढकलणार आहे. या चित्रपटाची शूटिंग ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. चित्रपटाशी संबंधित एका सूत्रानुसार, 'शाहिदला या चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यापूर्वी एका विशिष्ट लूकमध्ये यावे लागेल. त्याला आपल्या पात्रासाठी केस आणि दाढी वाढवावी लागेल. यासाठी अजून बराच कालावधी लागेल. हा रोमँटिक-ड्रामा चित्रपट ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याचा निर्णय अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शकाने मिळून घेतला आहे.' या चित्रपटाशिवाय शाहिदचा 'बत्ती गुल मीटर चालू' सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात (२१ सप्टेंबर) रिलीज होईल. अशा वेळी त्याला या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही वेळ मिळेल. शाहिदची पत्नी मीरा पुन्हा आई होणार आहे आणि याचदरम्यान त्याच्या दुसऱ्या बाळाचा जन्मदेखील होऊ शकतो.
'बत्ती गुल...'सोबत प्रदर्शित होणार नवाजचा 'मंटो'
नंदिता दास दिग्दर्शित नवाजुद्दीन सिद्दिकी अभिनीत 'मंटो' गेल्या काही काळापासून चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट २१ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. शाहिद, श्रद्धा कपूर आणि यामी गौतम अभिनीत 'बत्ती गुल मीटर चालू'देखील याच दिवशी रिलीज होईल. राजकुमार राव अभिनीत चित्रपट '५ वेडिंग'देखील याच दिवशी झळकत आहे. अशा वेळी तिन्ही चित्रपटांची टक्कर होणार, हे निश्चित. भलेही 'मंटो'चे ट्रेलर रिलीज झालेले आहे, पण याच्या पोस्ट प्रॉड्क्शनचे काम अजूनही सुरू आहे. चित्रपटाला प्रमाणपत्रही मिळणे बाकी आहे. तथापि, निर्मात्यांनी रिलीज डेट आधीच घोषित केली आहे, जेणेकरून ते डेडलाइनपर्यंत काम पूर्ण करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.