Home | Gossip | shahid kapoor's brother ishan khattar pays penalty parking bike in no parking area

शाहिद कपूरच्या भावाच्या एका चुकीमुळे त्याला भरावा लागला दंड, व्हायरल होत आहे Video

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 16, 2019, 02:30 PM IST

नियम तर नियम आहे, मग तू SRK असो किंवा KRK - एक यूजर

  • shahid kapoor's brother ishan khattar pays penalty parking bike in no parking area

    मुंबई : सरकारी नियमांचे पालन करणे देशातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे आणि हा कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. याची प्रचिती मुंबई ट्राफिक पोलिसांनी तेव्हा करून दिली, जेव्हा त्यांनी शाहिद कपूरचा भाऊ आणि अभिनेता ईशान खट्टरवर दंड आकारला. झाले असे की, ईशानने एका रेस्तरॉच्या बाहेर नो पार्किंग एरियामध्ये आपली बाइक उभी केली होती, त्यानंतर ट्राफिक पोलिसांनी त्याच्यावर 500 रुपयांचा दंड आकारला.

    असे आहे पूर्ण प्रकरण...
    ईशान खट्टर वांद्र्यातील बेस्टियन रेस्तरॉच्या बाहेर आपली बाईक पार्क करून वर्कआउटनंतरचे जेवण करण्यासाठी गेला होता. यादरम्यान त्याने बाइक नो पार्किंग एरियामधेच उभी केली. जेव्हा तो रेस्तरॉच्या बाहेर आला तेव्हा ट्राफिक पोलीस त्याची बाइक क्रेनने उचलून घेऊन जात होते. नंतर ईशानने 500 रुपयांचा दंड भरला. त्यांनतर पोलिअसन्नि त्याला समजावून त्याची बाइक त्याला परत केली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर गतीने व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका व्यक्तीने लिहिले - 'मुंबई आरटीओ आजकाल चांगले काम करत आहे.' तसेच आणखी एकजण म्हणाला, 'नियम तर नियम आहे, मग तू SRK असो किंवा KRK.'

Trending