आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील दंगलीत पोलिसांवर बंदूक रोखणारा शाहरुख अखेर अटकेत

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : उत्तर पूर्व दिल्लीतील दंगलीत हेड कॉन्स्टेबल दीपक दहिया यांच्यावर पिस्तूल रोखणाऱ्या मोहंमद शाहरुख याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील शामलीमधून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर त्याने गोळीबारात वापरलेले पिस्तूल मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.   सुरुवातीला केलेल्या चौकशीत आंदोलनात एकट्यानेच पोहोचल्याचा खुलासा शाहरुखने केला आहे, तर गोळीबार केल्याचेही त्याने मान्य केले आहे. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लाल शर्टात दिसणाऱ्या शाहरुखचा पोलिसांवर बंदूक रोखतानाचे छायाचित्र व्हायरल झाले होते. शाहरुखने पोलिसांवर केवळ पिस्तूल रोखून धरले नव्हते तर त्याने आठ राउंंडदेखील फायर केले होते. गोळीबार केल्यानंतर त्याने दिल्लीतील कॅनॉट प्लेसच्या दिशेने पळ काढला होता. पोलिसांपासून बचावासाठी तो काही तास कारमध्येच झोपलेला होता. पोलिस दंग्यांमध्ये तैनात असल्याची खात्री झाल्यानंतर तो पंजाबमध्ये गेला. 
 

बातम्या आणखी आहेत...