आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahrukh Khan Celebrating 54th Birthday Today, Bollywood Celebs Shared Memorable Stories

 थिएटरबाहेर उभे राहून आयुष्मानने बघितला होता 'दिल तो पागल है', सेलेब्सनी शेअर केले खास किस्से 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

   एंटरटेन्मेंट डेस्कः  बॉलिवूडचा बादशहा किंग खानचे लाखो फॅन्स आहेत. सामान्यांसोबतच इंडस्ट्रीतील आजचे स्टार्सदेखील शाहरुखचे जबरा फॅन्स आहेत. आज शाहरुखच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या सेलिब्रिटी मित्रांनी सांगितले, कशा प्रकारे त्याची प्रेरणा घेत ते अभिनयात उतरले... 

  • 'शाहरुखने मास कम्युनिकेशची पदवी घेतली होती, म्हणून मीदेखील ती पदवी घेतली ' - आयुष्मान खुराणा

शाळा, कॉलेज सोडा, मी तर लहानपणापासून शाहरुखचा मोठा चाहता आहे आणि आजही आहे. मी मास कम्युनिकेशन देखील केले आहे. कारण शाहरुख खानदेखील असेच केले होते. मला नेहमीपासूनच अभिनेता व्हायचे होते, मात्र फक्त अभिनेता नव्हे तर इंटेलिजेंट अॅक्टर व्हायचे होते. जेव्हा हा विचार आला तर त्याच्यासारखेच बनण्याचा विचारही आला. तेव्हा कुठे मी गांभीर्याने अभ्यास केला. विशेष म्हणजे मला कुठेच प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे पंजाब विद्यापीठात प्रवेश घेऊन मास कम्युनिकेशन केले. मला आजही आठवतेय मी त्यांचा 'दिल तो पागल है' ब्लॅकमध्ये तिकीट विकत घेऊन पाहिला होता. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मी सकाळीच सायकल घेऊन पंचकुलाच्या केसी थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेलो होतो. तेथे गेल्यावर पाहिले, शो हाउसफुल होता. एकही सीट रिकामी नव्हती. पूर्ण हॉल भरला होता. तेव्हा मी पूर्ण चित्रपट उभे राहून पाहिला. तिकिट कितीमध्ये विकत घेतले होते याची आठवण नाही, मात्र चित्रपट उभे राहून पाहिल्याचे आठवते. मी कधीच शाहरुखला या गोष्टी सांगितल्या नाहीत. मात्र कधी यावर चर्चा झाली तर नक्कीच सांगेन की, लहानपणी मी त्याचा असा चाहता होताे.

  • शाहरुखची मी मोठी चाहती - यामी गौतम

ऑफकोर्स, शाहरुखची मी मोठी चाहती आहे. त्याचे कारण त्याचे हार्ड वर्क आहे. तो सर्वात इंटेलिजंट अभिनेता आहे. त्याच्या अनेक मुलाखती मी पाहिल्या आहेत. त्या मुलाखतीत त्याची विनोदबुद्धी असो किंवा कामाच्या बाबतीत असो सर्व काही आजही कायम आहे. त्याच्या चित्रपटासाठी मी कधी शाळा-कॉलेजमध्ये क्लास बंक केले नाही. मात्र ऑफकोर्स आय लव्ह शाहरुख खान.

  • मला अभिनेता व्हायचंय हे त्यांना न सांगताच कळले - सिद्धार्थ मल्होत्रा

शाहरुख यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तेदेखील बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच. मी त्यांच्या 'माय नेम इज खान' चित्रपटात काम केले होते, तेव्हा मी त्या चित्रपटाच्या सहायक दिग्दर्शकाच्या टीममध्ये होतो. मी त्यांच्याबरोबर लॉस एंजलिसच्या शेड्यूलमध्ये होतो. मग कॅमेरा रोल होण्याआधी मी त्यांच्यासाठी क्लॅप घेऊन उभा राहायचो. ते आपल्या रिझवान या पात्रावर तासन‌्तास काम करायचे. सर्वात वेगळे राहून ते सराव करायचे. आम्ही तेव्हा थोडेच दिवस सोबत होतो, तरीदेखील माझा अभिनयात रस असल्याचे त्यांना कळले. मला याची माहिती नव्हती. मात्र एक दिवस संवाद वाचताना ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, एखाद्या अभिनेत्याला लोकेशनवर आपल्यावर नेहमी प्रॉप्स यूज करायला हवे. मी तेव्हा गाेंधळलो, ते नेमके कुणाला म्हणाले. तेव्हा मी त्यांच्याजवळ बसलो होतो, त्यामुळे विचारले, मला काही म्हटले का? ते म्हणाले, हो तुलाच म्हटले. त्यांचे ते शब्द खूपच प्रेरणादायी होते. मला आजही आठवते. इतक्या मोठ्या स्टारने असे बोलल्याने मी खूपच खुश झालो. इतका मोठा स्टार असूनही त्यांनी नवीन प्रतिभेला प्रोत्साहन दिले. ही त्यांची महानता आहे. खरं तर, काेणीच आपला गुरुमंत्र शेअर करत नाही. शिकून काेणी आमच्यापुढे गेले तर ही लाेकांना भीती असते. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर मी त्यांच्या बॅनरचा 'इत्तेफाक'देखील केला हाेता. त्यांनी जीवनात सर्व काही मिळवले आहे, मी त्यांना काय गिफ्ट देऊ ? मीदेखील त्यांच्या हजारो, कोट्यवधी चाहत्यांपैकी एक आहे. हो, मात्र अबरामसोबत त्यांनी वेळ घालवावा, ही माझी इच्छा आहे.