आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shahrukh Khan Congratulated Acid Attack Survivor Anupama On Her Wedding With Jagdeep Singh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरुख खानने अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता अनुपमाला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा, पोस्ट केला सेल्फी 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः मीर फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेशी निगडीत असलेल्या अॅसिड हल्ल्यातील पीडिता अनुपमा यांना अनोख्या पद्धतीने लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने अनुपमा यांच्या लग्नातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन नवविवाहित जोडप्याला सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनुपमा यांनी जयदीप सिंग यांच्याशी लग्न केले आहे. बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील थावे मंदिरात हे लग्न झाले.  मीर फाऊंडेशनच्या ट्विटर हॅण्डलवरदेखील अनुपमा आणि जयदीप सिंग यांच्या लग्नातील फोटो पोस्ट करण्यात आला आहे.  शाहरुखने आपल्या ट्वीटमध्ये अनुपमासोबतचा एक सेल्फी आणि त्यांच्या लग्नाचे दोन फोटो शेअर केले आहेत. शुभेच्छा देताना शाहरुखने लिहिले, अनुपमाला तिच्या नवीन आयुष्याच्या शुभारंभासाठी माझ्याकडून प्रेम आणि शुभेच्छा. 

  • गेल्या महिन्यात शाहरुख गेला होता भेटीला...

अनुपमा या शाहरुख खानच्या ‘मीर फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेशी निगडीत आहेत. 2013 मध्ये शाहरुखने अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी या स्वयंसेवी संस्थेची सुरुवात केली होती. गेल्या पाच वर्षात देशभरातील हजारो अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना या संस्थेने मदत केली आहे. या महिलांवर उपचार करुन त्यांना आत्मविश्वासाने नवं आयुष्य सुरु करण्यासाठी ही संस्था मदत करते. गेल्या महिन्यात शाहरुख दिल्लीस्थित मीर फाऊंडेशनमध्ये अॅसिड हल्ल्यातील पीडितांना भेटायला गेला होता.  120 महिला हजर होत्या, त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.