• Home
  • Gossip
  • Shahrukh Khan expressed his desire said, 'I want to do an action film, but nobody writes for me'

Bollywood / शाहरुख खानने व्यक्त केली इच्छा, म्हणाला - 'अॅक्शन फिल्म करण्याची इच्छा आहे, मात्र कुणी माझ्यासाठी लिहित नाही' 

टीव्हीचा कलाकार आहे, माझ्यासाठी माध्यमं महत्त्वाची नाहीत

दिव्य मराठी वेब

Aug 12,2019 01:16:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : शाहरुख खानचे चाहते बऱ्याच काळापासून त्याच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेची वाट पाहत आहेत. गेल्या वर्षभरात शाहरुखचे नाव साधारणत: १० वेगवेगळ्या चित्रपटाशी जोडले गेले मात्र त्यापैकी कोणत्याही चित्रपटाची घोषणा झालेली नाही. तथापि, शाहरुखने नेटफ्लिक्ससोबत अनेक प्रोजेक्ट्स वर काम करण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त तो लवकरच टेड टॉक्समध्येही दिसणार आहे. आतापर्यंत चित्रपटाविषयी त्याने कोणतीच घोषणा केलेली नव्हती. आता एक अॅक्शन चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली.

नुकत्याच दिलेल्या आपल्या एका मुलाखतीत शाहरुख म्हणाला, मी आतापर्यंत एकही चित्रपट साइन केला नाही. मी बऱ्याच स्क्रिप्ट ऐकल्या मात्र त्या माझ्यासाठी नव्हत्या. मात्र आता मला एक अॅक्शन चित्रपट करण्याची इच्छा आहे. त्यात थोडा विनोदही असावा. शत्रूसोबत दोन हात करू इच्छित आहे, उत्कृष्ट संवाद बोलू इच्छित आहे, मात्र मी स्वत:देखील याविषयी काही पाउल उचलले नाही. त्यापेक्षाही वाईट म्हणजे माझ्यासाठी कोणीच असे पात्र लिहित नाही, याचे दु:ख वाटते.

बऱ्याच वेळा एक-दोन चित्रपटाच्या ऑफर येतात, त्यावर काम सुरू असते तोच तिसऱ्याची ऑफर येते, मात्र आता तर माझ्याकडे एकही चित्रपट नाही. निर्मातेही माझ्याकडे फिरकत नाहीत, कोणीही चित्रपट ऑफर केला नाही. याचाही आनंद घेता आला पाहिजे. याउलट टि्वटरवर सुरू असते. मी जेव्हा टि्वटर पाहतो तेव्हा तेथे अफवा सुरू असते. शाहरुख आपल्या वाढदिवसानिमित्त आगामी चित्रपटाची घोषणा करणार आहे. या अफवामुळे मी इतके चित्रपट केले जितके खऱ्या आयुष्यात केले नाहीत. 

टीव्हीचा कलाकार आहे, माझ्यासाठी माध्यम महत्त्वाची नाहीत...
वेब शो करणार की चित्रपट, असे जेव्हा शाहरुखला विचारले, तेव्हा तो म्हणाला, मला आतापर्यंत कशाचीच ऑफर आलेली नाही. मी एक टीव्ही कलाकार आहे. माझ्यासाठी माध्यमं महत्त्वाची नाहीत. ज्यात मला आनंद येईल, ते मला करायला आवडेल.

शाहरुखचे आगामी प्रोजेक्ट्स...
- डेव्हिड लॅटरमनच्या शोमध्ये दिसणार.
- इमरान हाशमी स्टारर वेब शो 'बार्ड ऑफ ब्लड'ची निर्मिती करणार.
- बॉबी देओल स्टारर 'क्लास ऑफ 83'देखील निर्मिती करणार.
- टीव्हीवर ट्रेड टॉक्सचा दुसरा सीझन घेऊन येणार आहे.

X
COMMENT