आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किती अवघड होती बुटक्या माणसाची भूमिका ? चित्रपट चालत नाही तेव्हा कसे वाटते ? शाहरुख खानने मुलाखतीत दिली चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याशी निगडित अनेक प्रश्नांची उत्तरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ‘लोक तेच पाहतात जे ते पाहू इच्छितात. लोकांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही तुमचे काम बेस्ट करू शकता. त्यामुळे मी प्रत्येक मिनिट स्वतःचे बेस्ट देत असतो.’ असे म्हणणे आहे अभिनेता शाहरुख खान याचे. चित्रपट ‘झिरो’ च्या रिलीज (21 डिसेंबर) पूर्वी त्याने भास्करशी बातचीत केली होती. 

 

प्रश्न : 'झिरो' मध्ये बुटक्याची भूमिका करणे अवघड होते का ? 
शाहरुख : खूप कठीण तर नव्हते. शूटिंगच्या 8-9 महिन्यानंतर आपले काम पाहून आम्ही खुप खुश होतो. आम्ही चित्रपटातील अवघड भाग शूट केले होते. हे व्हीएफएक्स शिवाय शक्य नव्हते. व्हीएफएक्समुळे शूटिंगला खूप वेळ लागला आणि हे खूप महागही आहे. 

 

प्रश्न : खूप मेहनत केल्यानंतरही कधी-कधी चित्रपट चालत नाहीत. तेव्हा तू काय विचार करतोस ? 
शाहरुख : चित्रपटाकडे बघण्याचा प्रत्येकाचा आपला एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्यामुळे तुम्हाला याची काळजी करणे थांबवावेत लागते. काही लोक चित्रपट खूप पसंत करतात तर काहींना तो आवडत नाही, पण खूप मेहनत केल्यानंतरही चित्रपट चालला नाही तर मात्र वाईट वाटते. 

 

प्रश्न : एका स्टारकडून ही अपेक्षा असते की त्याचा प्रत्येक चित्रपट चालावा. पण हे खरे नाही. तू तुझ्या आत्तापर्यंतच्या कमला कसे पाहतोस ?  
शाहरुख : हे काम खूप अवघड आहे.  जेव्हा लोकांना माझे काम आवडत नाही तेच मला काळात नाही की त्यांना ते का आवडले नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवत नाही. मला माहित आहे की लोक तेच पाहतात जे त्यांना पाहायला आवडते. त्यामुळे मी प्रत्येक मिनिट माझे बेस्ट देत असतो. 

 

प्रश्न : मुलगी सुहानाही चित्रपटात येण्याच्या तयारीत आहे का ? 
शाहरुख : सुहाना एक्टिंगला निवडले तर आनंदच होईल. तिने जर थियेटर, स्ट्रीट आणि सोलो प्ले केले तर अजूनच छान वाटेल. शिक्षण पूर्ण करेल आणि मगच एखादा प्लेटफॉर्म निवडेल. 

 

प्रश्न : चित्रपटाविषयीचा लोकांचा निर्णय तुझ्यासाठी किती महत्वाचा आहे ?
शाहरुख : प्रत्येक चित्रपटाचे यश वेगवेगळे असते. जेव्हा तुम्ही कमर्शियल चित्रपट बनवता, तेव्हा लोक म्हणतात तुम्ही छान काम केले. पण जर चित्रपट चालला नाही. लोक तुमच्याकडून अपेक्षा करतात कि तुम्ही मोठे स्टार आहेत मग तुमचा चित्रपट चाललाच पाहिजे. हे खरे नाही. 

 

प्रश्न : व्हीएफएक्सविना चित्रपट बनवणे शक्य आहे ?
शाहरुख : जर आपल्याकडे व्हीएफएक्स नसेल तर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही. मी ‘बाहुबली’ चित्रपटाला शुभेच्छा देतो. ज्यांनी व्हीएफएक्सच्या क्षेत्रात मार्गदर्शकाची काम केले. व्हीएफएक्स आणि टेक्नोलॉजी हे चित्रपटाच्या गोष्टीला अजून चांगले बनवण्यासाठी आहे. लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही. 

 

प्रश्न : लोक तुला ‘किंग खान’, ‘सुपरस्टार’ अशा अनेक नावांनी संबोधतात. यावर तुझे काय मत आहे ?
शाहरुख : लोक म्हणतात की मी शानदार आहे. माझे काम चांगले आहे. पण मी या सगळ्याला सीरियसली घेत नाही. मी हार्डवर्क करतो आणि घरी जाऊन झोपून राहतो. नेहमी स्वतःचे बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा तितके चांगले होत नाही. 

बातम्या आणखी आहेत...