आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahrukh Khan Helped Team 'Marjawan' Movie To Make Ritesh Deshmukh A Shirt Villain Vishnu

रितेश देशमुखला बुटका विष्णु बनवण्यासाठी शाहरुख खानने केली होती 'मरजावां' चित्रपटाच्या टीमची मदत 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रितेश देशमुख पहिल्यांदा बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत त्याचा चित्रपट 'मरजावां' 15 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. रितेशने याचा खुलासा केला आहे की, चित्रपटात आपल्या भूमिकेसाठी त्याला शाहरुख खानकडून व्हीएफएक्स शॉट्ससाठी मदत मिळाली आहे, कारण त्याच्या आधी शाहरुखने 'झिरो' चित्रपटात बऊआ सिंह नामक एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे.  

एकाचवेळी सुरु होते दोघांचेही शूटिंग... 
रितेशने सांगितले की, जेव्हा शाहरुख 'झिरो' चे शूटिंग करत होता तेव्हा योगायोगाने तोदेखील 'मरजावां' चे शूट करत होता. त्याने मिलापची मदत केली कारण त्यांच्याकडे व्हीएफएक्स उपकरण आणि त्यांचे प्रोडक्शन बजेटदेखील खूप जास्त होते. मिलाप झवेरीचा चित्रपट 'मरजावां' मध्ये रकुल प्रीत सिंह, तारा सुतारिया हेदेखील दिसणार आहेत.  

मेकर्सने जारी केला होता मेकिंग व्हिडिओ... 
'मरजावां' च्या मेकर्सने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये रितेश देशमुख आपले पात्र विष्णु साकारताना दिसत आहे. चित्रपटात तो 3 फुटाचा व्हिलन बनला आहे, ज्याचे शूटिंग करणे रितेशसाठी काही कमी अवघड नव्हते.  


आगामी / 'मरजावा' चित्रपटात बुटका व्हिलन बनला आहे रितेश देशमुख, मेकर्सने शेअर केला ऑनलोकेशन व्हिडिओ