आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'झिरो' चित्रपटातील 'बउआ' या भूमिकेसाठी जीशानने शाहरुख खानला शिकवली मेरठची भाषा, चित्रपट प्रोड्यूस केला आहे गौरी खानने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आनंद एल रायच्या दिग्दर्शनात बनलेला चित्रपट 'झिरो' मध्ये शाहरुख खानच्या भूमिकेचे नाव बउआ आणि जीशान अयूब याच्या भूमिकेचे नाव गुड्डू आहे या दोघांमध्ये चांगली मैत्री चित्रपटात पाहायला मिळते आहे. हे दोघे आता खऱ्या आयुष्यातही चांगले मित्र बनले आहे. एवढेच नाही तर मेरठला रहाणार्या जीशानने शाहरुखला बउआ सिंहच्या भूमिकेसाठी तेथील बोलीभाषा आणि हावभाव शिकवले. 

 

मेरठी लहेज्यात करत होते गप्पा.. 
'झिरो' चित्रपटातील मुख्य पात्र 'बउआ' मेरठ शहरातील निवासी आहे, त्यामुळे शाहरुखला आपल्या पात्राला न्याय देण्यासाठी मेरठची भाषा आणि तेथील हावभाव शिकावे लागले. यासाठी जीशान, शाहरुखसोबत मेरठमध्ये बोलल्या जाणाऱ्या लहेज्यातच गप्पा मारायचा. त्यामुळे शाहरुखला ही भाषा लवकर शिकायला मदत मिळाली. शाहरुख आणि जीशानने याअगोदर चित्रपट 'रईस' मधील आपल्या मैत्रीमुळे प्रेक्षकांची मने जिंकली होती. या दोन्ही अभिनेत्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला 'झिरो' च्या टीजर आणि गाण्याच्या रिलीजनंतर खूप पसंत केले जात आहे. 

 

या शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटात शाहरुखने एका बुटक्या माणसाची भूमिका साकारली आहे. अनुष्का सेरेब्रल पाल्सी बीमारीने पीडित असलेली आफिया नावाच्या शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे तर कतरिना बॉलिवूड सुपरस्टार (बबिता कुमारी) या भूमिकेत दिसत आहे. 

बातम्या आणखी आहेत...