आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका अपंग फॅनची शाहरुख खानने घेतली भेट, हात मिळवला आणि आलिंगणदेखील दिले, आपल्या फेव्हरेट स्टारला पाहून फॅन पुन्हा पुन्हा म्हणत राहिला, 'I Love You', व्हायरल होत आहे Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आयपीएल सुरु झाले आहे. रविवारी शाहरुख खानची टीम कलकत्ता नाइट रायडर्स यांचा सामना सन रायजर्स हैदराबाद यांच्यासोबत झाला. यामध्ये शाहरुखच्या टीमने मॅच जिंकली. कलकत्ता ईडन गार्डन्समध्ये झालेल्या या मॅचदरम्यान शाहरुख आपल्या एका अपंग फॅनलाही भेटला. व्हील चेयरवर बसलेल्या फॅनसोबत शाहरुखने हात मिळवला आणि त्याला आलिंगणदेखील दिले. यादरम्यान पुन्हा पुन्हा फॅन शाहरुखला आय लव्ह यू म्हणत राहिला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. फॅन्स शाहरुखचा हा व्हिडीओ पाहून त्याचे खूप कौतुक करत आहे. एका फॅनने लिहिले, 'याला म्हणतात सुपर स्टार'. दुसऱ्या एका फॅनने कमेंटमध्ये लिहिले, 'यामुळेच बॉलिवूडचा किंग आहे शाहरुख खान'. एक जण म्हणाला, 'Your a golden heart man'. 

बातम्या आणखी आहेत...