आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahrukh Khan Said, 'my All Dreams Fulfilled By Karan Johar And Aditya Chopra ...'

शाहरुख खान म्हणाला - 'माझे प्रत्येक स्वप्न करण जोहर आणि आदित्य चोप्राने पूर्ण केले आहे...' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सुपरस्टार शाहरुख खानचे म्हणणे आहे की, फिल्ममेकर करण जोहर आणि आदित्य चोप्राने त्याचे प्रत्येक सवव पूर्ण केले आहे. त्याने सोमवारी एक फोटो कोलाज ट्विटवर शेअर केले, ज्यामध्ये एकीकडे करण आणि दूसरीकडे आदित्य दिसत आहे. फोटोसोबत इमोशनल नोटमध्ये शाहरुखने लिहिले आहे, "स्वप्न पाहणे चांगली गोष्ट आहे. पण जर त्यांना योग्य दिशा मिळाली नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही."

 

करण-आदित्यने माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण केले : शाहरुख...  
53 वर्षांच्या शाहरुखने पुढे लिहिले, "यांनी (करण आणि आदित्य) माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण केले. मी हे यासाठी सांगत आहे, कारण तुम्हाला माहित असायला पाहिजे की, तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त महत्वाचे ते आहेत, जे तुमचे स्वप्न पूर्ण करतात."

 

शाहरुखने करण जोहरसोबत 'कुछ-कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' आणि 'माय नेम इज खान' सारखे चित्रपट केले आहेत तर आदित्य चोप्रासोबत त्याने 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'जब तक है जान', 'वीर जारा' आणि 'रब ने बना दी जोड़ी' यांसारख्या चित्रपटात तो दिसला आहे. शाहरुखला रोमँटिक हीरो म्हणून ओळख मिळवून देण्याचे श्रेय दोन्ही फिल्ममेकर्सला जाते.  

 

'सत्ते पे सत्ता' च्या रीमेकमध्ये दिसू शकतो शाहरुख : रिपोर्ट... 
शाहरुखला शेवटचे डायरेक्टर आनंद एल. रायचा चित्रपट 'झिरो' मध्ये दिसला होता. ज्याने बॉक्सऑफिसवर खूप चांगले प्रदर्शन केले होते. रिपोर्ट्सनुसार, 1982 मध्ये रिलीज झालेला अमिताभ बच्चन स्टारर 'सत्ते पे सत्ता' च्या रीमेकमध्ये दिसू शकतो. हा चित्रपट फराह खान डायरेक्ट करणार आहे तर रोहित शेट्टी हा चित्रपट प्रोड्यूसर करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...