आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BOX OFFICE: 4500 हून अधिक स्क्रिन्सवर रिलीज झाला शाहरुख खानचा चित्रपट 'झिरो', पहिल्या दिवशी जमवला एवढ्या कोटींचा गल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड डेस्कः 2018 चा बहुप्रतिक्षित चित्रपट  'झिरो' हा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला असून रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने 20.14 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटात शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असून बॉलिवूडच्या तब्बल 50 स्टार्सनी यात कॅमिओ केला आहे. चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचे दर्शन घडते.  शाहरुखने चित्रपटात बुटक्या बहुवाची भूमिका वठवली आहे.

 

ख्रिसमस व्हेकेशनपासून आशा...

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन  'झिरो' चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन शेअर केले आहे. त्यात त्यांनी लिहिले की,  4380हून अधिक स्क्रिन्सवर रिलीज होऊनदेखील चित्रपटाने पहिल्या दिवशी 20.14 कोटींची कमाई केली आहे. शनिवार आणि रविवार कलेक्शनच्या दृष्टीने दोन महत्त्वाचे दिवस ठरू शकतील. आता हा चित्रपट विकेण्ड किती कमाई करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  

 

#Zero has underperformed on Day 1, despite extensive release [4380 screens] + #Christmas vacations... Sat and Sun biz extremely crucial... Fri ₹ 20.14 cr. India biz.

— taran adarsh (@taran_adarsh) December 22, 2018

 

Thank u all from the bottom of our hearts for making #ZeroDay so special... https://t.co/3ypCFSElGD pic.twitter.com/1k6dbZBcGm

— Shah Rukh Khan (@iamsrk) December 21, 2018

 


200 कोटींत बनला चित्रपट...
आनंद एल राय दिग्दर्शित  'झिरो' या चित्रपटाचे बजेट 200 कोटी आहे.  'झिरो' हा चित्रपट वर्ल्डवाइड तब्बल 5965 स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला आहे. भारतात हा चित्रपट 4380 स्क्रिन्सवर तर परदेशात 1585 स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे.  चित्रपटाला मिळालेल्या रिव्ह्यूजसाठी शाहरुखने सर्व समिक्षकांचे आभार मानले आहेत. 


ओपनिंग डे आणि खान मुव्हीज... 
बॉलिवूडच्या खान मंडळींचे चित्रपट आणि 2018 मध्ये आलेल्या चित्रपटाच्या ओपनिंग डे कलेक्शविषयी सांगायचे म्हणजे, ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सलमान खानच्या रेस 3 चित्रपटाने पहिल्या दिवशी 27 कोटींचा व्यवसाय केला होता. तर दिवाळीच्या काळात रिलीज झालेल्या आमिरच्या ठग्स ऑफ हिंदोस्तानने सर्व रेकॉर्ड मोडित काढत पहिल्या दिवशी तब्बल 52 कोटींची कमाई केली होती. अशाप्रकारे शाहरुखचा चित्रपट ख्रिसमसच्या काळात रिलीज झाला असून 20.14 कोटींच्या कमाईसह खान मुव्हीजमध्ये तिस-या स्थानावर आहे. 


'झिरो'चे ओव्हरसीज कलेक्शन...
ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या नुसार,  'झिरो'चे ओपिनंग डेचे ओव्हरसीज कलेक्शन हे 2 कोटींहून अधिक राहिले. ओव्हरसीजमध्ये 'झिरो'ने यूएसएमध्ये 1.42 कोटी, ऑस्ट्रेलियामध्ये 36.68 लाख, न्युझिलंडमध्ये 21.51 लाख कलेक्शन केले आहे.  

 

#Zero Day 1 Overseas BO:#USA - $203,066 [₹1.42 Crs] from 262 Locs.. At 4 PM PST.. #Australia - A$74,341 [₹ 36.68 Lacs] from 35 Locs.. #NewZealand - NZ$45,709 [₹ 21.51 Lacs] from 23 Locs..

— Ramesh Bala (@rameshlaus) December 22, 2018

 

बातम्या आणखी आहेत...