आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ICU मध्ये अखेरच्या घटका मोजत होती आई आणि शाहरुख देत होता त्यांना त्रास, स्वतः SRK सांगितले यामागचे कारण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्कः अभिनेता शाहरुख खानने वयाची 54 वर्षे पूर्ण केली आहेत. 2 नोव्हेंबर 1965 रोजी नवी दिल्लीत जन्मलेल्या शाहरुखने वयाच्या 16 व्या वर्षी वडील मीर ताज मोहम्मद यांना गमावले होते. कॅन्सरमुळे त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनाच्या दहा वर्षांनी शाहरुखची आई लतीफ फातिमा खान यांचे निधन झाले होते. अनुपम खेर यांच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वी शाहरुखने सांगितले होते की, आईच्या शेवटच्या काळात त्याने आईला त्रास दिला होता. यामागचे जे कारण होते, ते अतिशय इमोशनल करणारे होते.

आईला भेटायला शाहरुखला जायचे नव्हते आयसीयूत 
- शाहरुख खानने शोमध्ये सांगितले, ज्यादिवशी आईचे निधन झाले होते, त्यादिवशी दिल्लीतील बत्रा हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये तो आईसाठी प्रार्थना करत होता. त्यावेळी त्याची आई आयसीयूत दाखल होती. शाहरुख आईला भेटायला आयसीयूत जात नव्हता. कारण त्याला कुणी तरी सांगितले होते, की जर आईसाठी प्रार्थना करत राहिलास, तर आईला काहीही होणार नाही. शाहरुखने सांगितल्यानुसार, त्याला एका व्यक्तीने 100 वेळा दुआ मागण्यास सांगितली होती. पण त्याने 100 हून अधिक वेळा दुआ मागितली होती. तेव्हा अचानक डॉक्टर आले आणि शाहरुखला सांगितले की, तो त्याच्या आईला भेटायला आयसीयूत जाऊ शकतो. याचा अर्थ त्यावेळी त्याची आई शेवटच्या घटका मोजत होती. शाहरुखने सांगितले, "मला आयसीयूत जायचे नव्हते. कारण मला वाटत होते की, जर मी आईसाठी दुआ मागत राहिलो, तर तिला काहीही होणार नाही. पण मग बहीण आणि इतर लोकांनी मला आत जाणे गरजेचे आहे, असे सांगितले आणि मी आईला भेटायला गेलो."

आईसीयूत आईला त्रास देत होता शाहरुख... 
- शाहरुखने अनुपम खेर यांच्या शोमध्ये पुढे सांगितले, "माझा एका गोष्टीवर विश्वास आहे, तो म्हणजे, जेव्हा व्यक्ती प्रत्येक गोष्टीने संतुष्ठ असतो, तेव्हा हे जग सोडतो. जर असे नसेल, तर आईवडील आपल्या मुलांना सोडून जाऊ शकत नाहीत. जेव्हा मी आयसीयूत माझ्या आईच्या बसलो, तेव्हा मी चुकीचे वागलो. मी तिला दुःख देत राहिलो. कारण मी विचार केला की, जर मी तिला संतुष्ट होऊ दिले नाही, तर ती मला सोडून जाणार नाही. मी तिच्याजवळ बसून म्हणालो, की मी माझ्या बहिणीची काळजी घेणार नाही. मी शिकणारही नाही आणि कामदेखील करणार नाही. मी अशा मुर्ख गोष्टी तिथे करत होतो. जेणेकरुन तिला त्रास होईल आणि ती संतुष्ट होणार नाही... आणि आई मला म्हणेल, मी तुला सोडून जात नाहीये. पण ती संतुष्ट होती. तिला ठाऊक होते की, मी माझ्या बहिणीची चांगली काळजी घेईल आणि आयुष्यात चांगलं काहीतरी करेल."

ही होती वडिलांची शेवटची आठवण... 
- शाहरुखने एका मुलाखतीत आपल्या वडिलांच्या शेवटच्या आठवणीविषयी सांगितले. शाहरुखने सांगितले, त्यांना कॅन्सर होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना थोडे बरे वाटल्यानंतर आम्ही रुग्णालयातून त्यांना घरी आणले. घरी आल्यानंतर वडिलांनी व्हॅनिला आइस्क्रिम मागितली आणि मी त्यांना आइस्क्रिम दिली.  शाहरुख पुढे म्हणाला, "18 ऑक्टोबरची रात्र होती, मी झोपलो होतो. आईने येऊन मला उठवले आणि सांगितले की वडील हॉस्पिटलमध्ये आहेत. मला आठवतंय मी त्यांचे फक्त पाय पाहिले होते, त्यांचा चेहरा मी बघू शकलो नव्हतो. कारण त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले होते. माझी त्यांच्याविषयीची शेवटची आठवण त्यांच्यासोबत व्हॅनिला आइस्क्रीमची आहे."

बातम्या आणखी आहेत...