आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानचे लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन ; 54 व्या वाढदिवसादिवशी हा शो घेऊन येणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क - बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. सुत्रांच्या मते, शाहरुखचा शो 'टेड टॉक्स इंडिया : नई सोच' चा दुसरा सीझन नोव्हेंबरमध्ये सुरु होणार आहे. यावेळी या शो चे एका आठवड्यात दोन एपिसोड प्रसारित होणार आहेत. मागील सीझनमध्ये हा शो आठवड्यातून एकदाच प्रसारण व्हायचे. मात्र यावेळी आठवड्यातील दोन दिवस एपिसोडचे प्रसारण करण्यात येणार आहे. 2 नोव्हेंबर रोजी शाहरुख खानचा 54 वा वाढदिवस आहे. यामुळे त्याच दिवशी शो च्या प्रीमियरची प्लनिंग केल असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

ऑक्टोबरमध्ये होणार शो ची घोषणा
या शो सोबत निगडीत असलेल्या सुत्राने सांगितले. की,' चॅनेल गेल्या काही महिन्यांपासून टेड टॉक्सच्या तयारीत आहे. ते शाहरुख खानसोबत सामाजिक कार्यकर्त्यांशी वयक्तिकरित्या भेटत आहेत आणि शोची संकल्पना तयार करत होते. चॅनेल आणि शोच्या निर्मात्यांमध्ये अनेक बैठका झाल्या आणि ऑक्टोबरमध्ये याची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या शो ची तयारी सुरु करण्यात आली आहे.'
 

पहिल्या सीझनला टीआरपी मिळाला नव्हता
टेड टॉक्सच्या पहिल्या सीनझला म्हणावा तसा टीआरपी मिळाला नव्हता. कारण त्यातील कल्पना खूप वेगळ्या होत्या. या सीझनमध्ये सात एपिसोड्स दाखवण्यात होते. यांमध्ये करण जोहर, एकता कपूर आणि जावेद अख्तर सहभागी झाले होते. निर्माता नवीन सीझनमध्ये कोणत्याही बॉलीवूड कलाकाराचा समावेश करणार नसल्याचे सांगितले. जात आहे. त्याऐवजी सामाजिक कार्यकर्ते व्यासपीठावर येतील आणि त्यांच्या प्रेरणादायक गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतील. मोठ्या पडद्याविषयी बोलायचे झाले तर शाहरुखने 'झिरो' नंतर कोणताही चित्रपट साइन केलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...