Bollywood / न्यूयॉर्कमध्ये ऋषी कपूरला भेटण्यासाठी गेला शाहरुख खान, नीतूने असे केले अभिनेत्याचे कौतुक  

दोघांच्या रीयूनियनचे फोटोज नीतू कपूरने शेयर केले...  

दिव्य मराठी

May 17,2019 04:40:40 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या ऋषी कपूर यांना बॉलिवूड सेलिब्रिटी सतत भेटत आहेत. मागील काही दिवसात दीपिका पदुकोण आणि विक्की कौशलने ऋषी कपूर यांना भेटून त्यांच्या तब्यतीची विचारणा केली. आता अभिनेता शाहरुख खाननेदेखील ऋषी कपूर यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली आहे. दोघांच्या रीयूनियनचे फोटोज नीतू कपूरने शेयर केले आहेत. नीतूने फोटोसोबत लिहिले, "लोकांना स्वतःविषयी चांगले फील करून देणे रेअर क्वॉलिटी आहे. शाहरुखकडे हा गुण आहे. शाहरुख खानचे प्रेम आणि केयर करणे खूप वास्तविक आहे. कामसोबतच त्याचे एक चांगला व्यक्ती असण्याचीही मला कौतुक वाटते.'' या व्हायरल फोटोमध्ये ऋषी कपूर आणि शाहरुख खानसोबत नीतू कपूरदेखील दिसत आहे.

शाहरुख खान आणि ऋषी कपूर 1992 मध्ये आलेली फिल्म 'दीवाना' मध्ये सोबत दिसले होते. किंग खानने ऋषी कपूर यांच्या अपोजिटच बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ऋषी कपूर मागच्यावर्षी सप्टेंबरपासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहेत. मात्र आता ते कॅन्सर फ्री झाले आहेत. पण त्यांना पूर्णपणे ठीक होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. काही महिन्यातच ऋषी कपूर भारतात परततील. शाहरुख खानपूर्वी न्यूयॉर्कमध्ये ऋषी कपूर यांना प्रियांका चोप्रा, सोनाली बेंद्रे, अनुपम खेर यांनीही भेट घेतली. ऋषी कपूर यांचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट 'मुल्क' होता.

X