आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahrukh Khan Will Play A Role Of Police Officer Yash Who Encounters Dadua, Tigmanshu Dhulia Preparing For A Film

शाहरुख खान साकारणार ददुआचा एन्काउंटर करणारा पोलिस अधिकारी यशची भूमिका, तिग्मांशु धूलिया करत आहेत तयारी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : ८० च्या दशकामध्ये चंबळचा कुख्यात डाकू ददुआवर आधारित चित्रपटाची घोषणा लवकरच होऊ शकते. काही काळापूर्वीच 'दिव्य मराठी'ने सांगितले होते की, तिग्मांशु धूलिया इरफान खानला घेऊन चित्रपटाची निर्मिती करणार आहे. इरफान चित्रपटात ददुआचे पात्र साकारणार आहे. यामध्ये ते शाहरुखनलाही घेणार असल्याचे वृत्त आहे. चित्रपटात ददुआचा एन्काउंटर करणारा पोलिस अधिकारी अमिताभचे पात्र साकारण्याबाबत तिग्मांशु शाहरुखला विनंती करत आहेत. 

 

इरफान साकारतोय डाकू...  
इरफानची निवड यापूर्वीच झालेली आहे. आता त्याच्या सोबतीला शाहरुखही येऊ शकतो. शाहरुखने यास होकार दिला तर दोघेही एकाच वेळी चित्रपटात दिसतील. इरफानने यापूर्वी 'पान सिंह तोमर'मध्ये डाकूचे पात्र साकारलेले आहे. तर दुसऱ्यांना शाहरुखला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी विनंती करण्यात आली आहे. यापूर्वी मधुर भंडारकरने त्याला 'इंस्पेक्टर गालिब'मध्ये पोलिसाची भूमिका ऑफर केली होती. तथापि, त्या चित्रपटाबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. आता अमिताभ यशच्या पात्राबाबत तो काय भूमिका घेतो, हे पाहणे रंजक ठरेल. तिग्मांशु आणि शाहरुख यांच्यात चर्चा झाल्याच्या वृत्तास त्याच्या जवळच्या लोकांनी दुजोरा दिला आहे. 

 

कोण आहेत अमिताभ यश? 
अमिताभ यश हे यूपी केडरच्या १९९६ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी एसटीएफमध्ये काम करत सुमारे तीन डझन गुन्हेगारांना ठार मारले होते. त्यांच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या. अनेकदा गुन्हेगारांना जेरीस आणल्यामुळे त्यांची बदलीदेखील करण्यात आली. तरीदेखील त्यांनी कधीच आपल्या शैलीमध्ये बदल केला नाही. जेव्हा-जेव्हा त्यांना जिल्ह्यांमध्ये रुजू होण्यास सांगितले तेव्हा काम पूर्ण झाल्यानंतर त्यांची एसटीएफमध्ये रवानगी करण्यात आली. अमिताभ मूळचे बिहारचे. त्यांना कडक स्वभाव आणि गुन्हेगारांचा सफाया करणारे अधिकारी म्हणून ओळखते जाते. 

 

अशी सुरू होईल चित्रपटाची कथा...  
कथेची सुरुवात उत्तर प्रदेशातील उरई जिल्ह्यातून दाखवली जाईल. इथेच अमिताभ यश यांना पोस्टिंग दिली होती. चित्रपटात आणखी एक अधिकारी दलजीत चौधरी यांचे पात्रदेखील असेल. त्यांच्याकडूनही अमिताभ यश खूप काही शिकले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या शिकवणीचा वापर त्यांनी नंतर डाकूंविरोधातील मोहिमांमध्ये केला. 

 

यांनाही मिळाली पोलिस पात्र साकारून लोकप्रियता... 
पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अभिनेत्यांना खूप पसंत केले जाते. आतापर्यंत सलमान खान, अजय देवगण, रणवीर सिंह, आमिर खान आणि अक्षय कुमार यांना पोलिसांच्या भूमिकेत चांगली लोकप्रियता मिळाली आहे. अक्षय कुमार पुन्हा एकदा 'सूर्यवंशी'मध्ये पोलिस अधिकारी साकारणार आहे. आमिर खाननेही 'सरफरोश' आणि 'तलाश'मध्ये एक प्रामाणिक पोलिस अधिकारी साकारला होता. आता शाहरुखने तिग्मांशुची ऑफर मान्य केली तर हा त्याचा पोलिस अधिकारी म्हणून पदार्पणाचा चित्रपट असेल. तथापि, यापूर्वीही त्याने 'वन टू का फोर'मध्ये साध्या वेशात पोलिस पात्र साकारले आहे. चित्रपटाचे शीर्षकही अमिताभ यश यांच्या आडनावावर आधारित आहे.

बातम्या आणखी आहेत...