आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahrukh Khan's Cousin Noor Jahan Passed Away In Pakistan, Suffering From Oral Cancer For A Long Time

शाहरुख खानची कझिन नूर जहांचे पाकिस्तानमध्ये निधन, बऱ्याच काळापासून तोंडाच्या कॅन्सरने होती ग्रस्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : शाहरुख खानची कझिन (काकाची मुलगी) नूर जहांचे निधन झाले आहे. खूप काळाच्या आजारानंतर 52 वर्षांच्या नूर जहांने पकिस्तानमध्ये पेशावरहून किस्सा ख्वानी बाजारमध्ये अखेरचा श्वास घेतला. ती तिथल्या मोहल्ला शाहवाली क़ताल एरियामध्ये राहात होती. नूर जहांचा पती आसिफ बुरहानने सांगितल्याप्रमाणे ती तोंडाच्या कॅन्सरचा सामना करत होती.  

राजकारणात सक्रिय होती नूर जहां... 

जिल्हा आणि नगर काउन्सिलर असलेली नूर जहां राजकारणात सक्रिय होती. पाकिस्तानमध्ये झालेल्या 2018 च्या निवडणुकीमध्ये तिने पीके-77 क्षेत्रातील खैबर पख्तूनख्वा असेंबली सीटवरून अपक्ष उमेदवार म्हणून नोंदणी केली होती. मात्र, नंतर तिने ते परत घेतले.  

1997 आणि 2011 मध्ये भारतात आली होती नूर जहां... 

आसिफ बुरहान यांनी सांगितल्याप्रमाणे, नूर जहां आपला भाऊ शाहरुखला भेटण्यासाठी 1997 आणि 2011 मध्ये भारतातही आली होती. बालपणी शाहरुखदेखील दोनदा आपल्या पॅरेंटसोबत पेशावरला गेला आहे. नूर जहां आणि शाहरुखच्या कुटुंबीयांमध्ये फोनवर अनेकदा बातचीत होत असते.  

पेशावरला जाऊ इच्छितो शाहरुख... 

काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये शाहरुख म्हणाला होता, "माझे कुटुंब पेशावर येथी आहे. अजूनही काही लोक तिथे राहतात. मी तिथे जाण्यासाठी खूप उत्सुक आहे. मुलांनाही तेथे घेऊन जाऊ इच्छितो, कारण माझे वडीलही मला वयाच्या 15 व्या वर्षी तिथे घेऊन गेले होते. माझ्याकडे अजूनही त्या सुंदर क्षणांच्या आठवणी आहेत, जे मी माझ्या वडिलांसोबत पेशावर, कराची आणि लाहोरमध्ये घालवले आहेत. तेथील लोकांचे वर्तन खूप चांगले आहे. ते पाहुणचार खूप चांगल्याप्रकारे करतात. तिथे मी लोकांवर प्रेम करायला शिकलो आहे."

बातम्या आणखी आहेत...