आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत 13 विद्यार्थ्यांसोबत भाड्याने राहून शिकत आहे शाहरुख खानचा मुलगा आर्यन, SRK ने एका मुलाखतीत केला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान अमेरिकेत शिकत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, आर्यन तेथे साधारण लोकांच्या मुलांसारखा भाड्याच्या घरात राहतो. यापेक्षाही मजेशीर गोष्ट ही आहे की, आर्यन एक दोन नाही तर चक्क 13 मुलांसोबत भाड्याने राहतो. या गोष्टीचे स्पष्टीकरण स्वतः शाहरुख खानने मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत दिले. शाहरुख म्हणाला होता, आर्यनने जेव्हा घर शिफ्ट केले, तेव्हा तो त्याला तिथे भेटण्यासाठी गेला होता. 

 

आर्यन शाहरुखला म्हणाला होता, एकटे राहण्यात मजा येत नाही...
शाहरुखने एका मुलाखतीदरम्यान सांगितले, "माझा मुलगा अमेरिकेत राहतो. काही दिवसांपूर्वीच त्याने आपले घर शिफ्ट केले आहे. मी त्याला भेटायला गेलो तेव्हा पहिले की, 7 रूमचे घर आहे आणि त्यात ते 13 मुले सोबत राहतात. आम्ही त्याला म्हणालो तू शेअरिंगमध्ये का राहतो आहे. एकटा राहा. आरामात आपल्या कम्फर्टनुसार राहा. तेव्हा आर्यन म्हणाला, त्याला एकटे राहण्यात मजा येत नाही. त्याला ग्रुपमध्ये राहणे आवडते." शाहरुखने हे स्पष्टीकरण शुक्रवारी  रिलीज झालेला आपला चित्रपट 'झिरो' च्या एका प्रमोशनल इवेंटमध्ये केले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...