आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahrukh's Video Of Republic Day Went Viral : "I Am Muslim, My Wife Is Hindu And My Children Are Hindustan"

प्रजासत्ताक दिनी शाहरुखचा व्हिडिओ व्हायरल, म्हणाला - 'मी मुस्लिम, माझी पत्नी हिंदू आणि माझ्या मुलांचा धर्म हिंदुस्थान'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : शाहरुख खान रियलटी शो 'डान्स प्लस 5' च्या रिपब्लिक डे स्पेशल एपिसोडमध्ये सामील झाला होता. त्याने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. किंग खान म्हणाला की, त्याच्या मुलांचा धर्म हिंदुस्थान आहे. शाहरुखचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.   

आम्ही इंडियनच आहोत यार... 

व्हिडिओमध्ये शाहरुख म्हणत आहे, "आम्ही हिंदू-मुस्लिम असे काही बोललोच नाही. माझी बायको हिंदू आहे, मी मुस्लिम आहे आणि माझी जी मुले आहेत ती, हिंदुस्थान आहेत. जेव्हा ते शाळेत गेले, त्यांच्या शाळेच्या फॉर्ममध्ये टाकावे लागले की, रिलीजन काय आहे. जेव्हा माझी मुलगी लहान होती तेव्हा तीने मला विचारले की, पप्पा आपले रिलीजन काय आहे. मी तिला म्हणालो की, आपण इंडियनच आहोत यार, कोणतेच रिलीजन नाहीये आणि असलेही नाही पाहिजे." 

मुलांना दिली वेगळी नावे...

शाहरुखने एका मुलाखतीत सांगोतले होते की, 'मी माझ्या मुलांना अशी नावे दिली आहेत, जी सामान्य आहेत. ही नावे संपूर्ण देशात आणि सर्व धर्मात लोक मान्य करू शकतात. - आर्यन आणि सुहाना. खान मी हटवले. 

बातम्या आणखी आहेत...