आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेनमेंट डेस्क - चित्रपटांमध्ये व्हिलन आणि कॉमेडियनच्या भूमिका करणारे शक्ती कपूर आज (3 सप्टेंबर) 66वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1952 रोजी दिल्लीत झाला होता. शक्ती कपूर यांनी स्क्रीनवर अनेक रेप सीन केले आहेत. रिपोर्ट्सनुसार एकदा शक्तीकपूर त्यांच्या आई-वडिलांना त्यांचा 'इन्सानियत के दुश्मन' चित्रपट दाखवण्यासाठी घेऊन गेले होते. त्याच त्यांचा एक रेपसीन होता. ते पाहून त्यांचे आई-वडील एवढे चिडले होते की, ते चित्रपट सोडून बाहेर आले होते. एवढेच नाही तर वडील त्यांना फार रागावलेदेखिल होते. त्यांनी शक्तीकपूर यांना असे विचारले होते की, ते काय फक्त मुलींना छेडण्याचेच काम करतात का. चांगल्या भूमिका करा.
दारुच्या सवयीमुळे नाराज झाली होती श्रद्धा
'जख्मी इंसान' हा एकमेव असा चित्रपट आहे ज्यात शक्ती कपूर हिरो बनले होते. दीड तासातच हा चित्रपट फ्लॉप झाला असे ते सांगतात. त्यामुळेच ते कॉमेडियन किंवा व्हिलनच्या भूमिका करतात. रियालिटी शो 'बिग बॉस 5' मध्येही शक्ती कपूर आलेले होते. यात 13 स्पर्धकांत ते एकटे पुरुष सदस्य होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, दारुच्या सवयीमुळे श्रद्धा त्यांच्यावर नाराज झाली होती. त्यामुळे त्यांना दारु पिणे कमी केले होते. त्यांना डान्सचीही आवड होती. त्यांची आवड पाहून अमजद खान यांनी त्यांचे नाव डिस्को क्वीन ठेवले होते.
शंभराहून अधिक चित्रपटांत काम
कादर खानबरोबर शक्ती यांची जोडी हिट ठरली. दोघांनी एकत्रित जवळपास 100 चित्रपट केले आहेत. त्यांनी 'गिरफ्तार', 'अमीर आदमी गरीब आदमी', 'मास्टर जी', 'इन्सानियत के दुश्मन', 'दोस्ती दुश्मनी', 'वक्त की आवाज', 'जैसी करनी वैसी भरणी', 'बाप नंबरी बेटी दस नंबरी', 'बोल राधा बोल', 'उम्र 55 की दिल बचपन का', 'आंखे', 'राजा बाबू', 'कुली नंबर वन', 'जुडवां' अशा चित्रपटांत काम केले आहे. शक्ती कपूर यांनी 'सत्ते पे सत्ता' द्वारे कॉमेडीची सुरुवात केली होती.
शक्ती कपूरची फॅमिली
शक्ती कपूर यांनी अॅक्ट्रेस पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण शिवांगी कोल्हापुरे यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना श्रद्धा आणि सिद्धांत अशी दोन मुले आहेत. श्रद्धाचा नुकताच रिलीज झालेला 'स्त्री' चित्रपट चांगली कमाई करतोय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.