आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shakti Kapoor To Shiney Ahuja Bollywood Celebs Career Effected Due To Haresment Incident

सेक्शुअल हॅरेसमेंट : एका CEO ला खुर्ची सोडावी लागली तर दिग्दर्शकाच्या हातून गेला मोठा चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः नाना पाटेकर, विकास बहल यांच्यानंतर आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप लागला आहे. एकामागून एक सेक्शुअल हॅरेसमेंटच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे या आरोपांतून यापूर्वी बाहेर पडलेल्या लोकांच्या नावांचीही पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. 'क्वीन' चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलच्या करिअरवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्याच्यावर फँटम फिल्म्समध्ये काम करणा-या एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप लावला आहे. इतकेच नाही तर कंगना रनोटनेही त्याच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. विकासवर लागलेल्या या आरोपांमुळे फँटम फिल्म्सचे त्याचे पार्टनर्स अनुराग कश्यप आणि विक्रम मोटवाने यांनी त्याच्यापासून फारकत घेतली आहे. त्यांनी अमेजन प्राइमच्या 'प्लॉट' या वेब शोमधून त्याचे नाव वगळून टाकले आहे. विकास बहलच्या वागण्याची कल्पना असूनदेखील एवढे दिवस शांत राहिल्याने आता अनुराग कश्यपवर टीका होत आहे. 


तर दुसरीकडे AIBचे को-फाउंडर आणि सीईओ तन्मय भटला त्याचे पद सोडावे लागले आहे. AIB च्या ह्यूमन रिसोर्स हेड विधी जोटवानी यांनी एक स्टेटमेंट जारी करुन तन्मयने AIB सोडले असल्याची माहिती दिली आहे. सोबतच आणखी एक को फाउंडर गुरसिमरन खंबालाही निलंबित केले आहे. फाउंडर मेंबर्स गेल्यानंतर आता AIB च्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या संस्थेचा सदस्य उत्सव चक्रवर्तीने एका महिलेचा लैंगिक छळ केला. याची कल्पना असूनदेखील तन्मय शांत राहिला होता. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक छळाचा आरोप लावल्यानंतर एकामागून एक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. यापूरवीही अनेक स्टार्सचे करिअर  सेक्शुअल हॅरेसमेंटच्या कारणाने उद्धवस्त होण्याच्या मार्गावर लागले होते. 

 

जॅकी श्रॉफवर आरोप 
अभिनेत्री जॅकी श्रॉफ वादापासून दूर राहणे पसंत करतात. पण 80च्या दशकात तब्बूची बहीण फराहने जॅकी यांच्यवर लैंगिक छळाचा आरोप लावला होता. मीडियात आलेल्या बातम्यांनुसार तब्बूची मोठी बहीण आणि अभिनेत्री फराह नाझ हिने एका मासिकाला दिलेल्या मुलाखातीत सांगितले होते, की तिने जॅकी श्रॉफवर तब्बूची छेडछाड करण्याचा आरोप केला होता. फराहच्या मते जेव्हा ही घटना घडली ती जॅकीच्या सोबत एका सिनेमाच्या शूटिंगसाठी गेली होती. त्यावेळी तब्बूदेखील त्यांच्यासोबत होती. तेव्हा ती 14-15 वर्षाची असेल. परंतू जॅकीवर केला गेलेला हा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. या प्रकरणात तब्बूने एका मुलाखातीत सांगितले होते की, अशा प्रकारची कुठलीही घटना घडली नव्हती.

 

स्टिंगमुळे उद्धवस्त झाले अमन वर्माचे करिअर 
टीव्ही अभिनेता आणि होस्ट अमन वर्मा 2005 मध्ये त्याच स्टिंगमध्ये शारिरीक संबंधाची मागणी करताना दिसला होता, त्याच्यासोबत शक्ती कपूर व्हिडिओत दिसले होते. अमन वर्मा आणि शक्ती कपूर दोघेही त्या रिपोर्टरला आपल्या बोलण्याने फसवत होते. 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला अमन जेव्हा या स्टिंग ऑपरेशनच्या घेर्‍यात अडकला आणि त्याचे करिअर काही क्षणांत उद्धवस्त झाले. त्याने 'इंडियन आयडॉल' या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले होते. परंतू त्याची या स्टिंगच्या आधी जी प्रतिमा होती ती आता नक्कीच राहिलेली नाही. अमन बिग बॉसच्या नवव्या पर्वात झळकला होता.

 

आदित्यवर लागला होता मोलकरणीवर बलात्काराचा आरोप
आदित्य पंचोलीचे आयूष्यात सतत काही ना काही वाद झाले आहेत. कधी तो विवाहित असून कंगना रनोटसोबत अफेअरच्या कारणामुळे तर कधी अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येनंतर आपल्या मुलावर झालेल्या आरोपामुळे चर्चेत राहिला आहे. याशिवाय आपल्या शेजार्‍यांशी शिवीगाळ करण्याचा आरोपही त्याच्यावर लागतात. परंतू बॉलिवूडला धक्का बसला जेव्हा त्याच्यावर घरातल्या मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी तो पूजा बेदीला डेट करत होता. पूजाने 2007 मध्ये एका मुलाखातीत सांगितले होते की, तिचे आणि आदित्यचे नातं तुटण्याचे एकमेव कारण म्हणजे त्या मोलकरणीसोबत झालेले लैंगिक शोषण हे आहे. 2009 मध्ये पूजाने बलात्काराच्या आरोपात अडकलेल्या शायनी अहूजाच्या पत्नीला हाच सल्ला दिला होता की, आधी तिने बलात्कार झाला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी कारण अशा आरोपांमुळेच तिचे आदित्यशी ब्रेक-अप झाले होते.

 

शायनीने मोलकरणीवर केला होता बलात्कार 
बॉलिवूड कलाकार शायनी आहूजा याच्यावर 2009 मध्ये त्याच्या मोलकरणीने बलात्काराचा आरोप केला होता. मोलकरणीच्या सांगण्यानुसार जेव्हा शायनीची पत्नी शहरात नव्हती, तेव्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.  शायनी सतत या गोष्टींचा विरोध करत राहिला परंतू DNA चाचणीत बलात्कार केल्याचे सिद्ध झाले. यानंतर त्याला तुरूंगची हवादेखील खावी लागली होती. या आरोपानंतर शायनीचे बॉलिवूडमधले करिअर संपुष्टात आले. ‘गँगस्टर’, ‘भूल भूलैया’ आणि ‘लाइफ इन ए मेट्रो’ यासारख्या सिनेमांत त्याने काम केले आहे. बलात्काराच्या प्रकरणात त्याला 27 एप्रिल 2011 रोजी न्यायालयाने त्याला जामीन दिला आणि 4 मे रोजी तुरूंगातून सोडून दिले होते.

 

कास्टींग काऊचच्या आरोपात अडकला शक्ती कपूर
बॉलिवूडमध्ये शक्ती कपूरची प्रतिमा सगळ्यांनाच ठाऊक आहे. एकीकडे तो सिनेमात व्हिलनच्या रूपात दिसतो तर दुसरीकडे फिल्मी रेपिस्टसचा विषय निघतो त्यातही त्याचे नाव सहभागी असते. रिल लाईफमध्ये गुन्हेगाराची भूमिका करणार्‍या शक्तीवर रिअल लाईफमध्येही असे आरोप झाले आहेत. 2005मध्ये एका स्टिंग ऑपरेशनच्या दरम्यान तो कास्टिंग काऊचच्या प्रकरणात अडकला होता. या स्टिंगमध्ये लोकांनी शक्तीचे मोठ्या पडद्यावर दिसणारे रूप प्रत्यक्षात पाहिले होते. तो एका रिपोर्टरकडे तिचे करिअर घडवण्याच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी करताना दिसला होता. यानंतर एका प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान शक्ती म्हणाला होता की, त्या रिपोर्टरनेच मला गोड गोड बोलून फसवले होते, कोणीही कोणाला असे बोलून फसवू शकते.

बातम्या आणखी आहेत...