बॉलिवूड / पडद्यावर दिसणार मानवी संगणक शकुंतलाचे कौशल्य, शकुंतला देवींच्या भूमिकेत दिसेल विद्या बालन 

लंडनमध्ये सुरू झाले शूटिंग, दिग्दर्शन आणि लिखाणाची कमान महिलांच्या हाती

Sep 16,2019 11:33:43 AM IST

बॉलिवूड डेस्क : नुकतेच प्रदर्शित झालेल्या 'मिशन मंगल' मधून दमदार पुनरागमन करणारी विद्या बालन लवकरच आपल्या दुसऱ्या चित्रपटावर काम सुरू करणार आहे. हा मानव संगणक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शकुंतला देवी यांचा बायोपिक आहे. या चित्रपटाची घाेषणा या वर्षी मे महिन्यात करण्यात आली होती. आता याचे शीर्षक 'शकुंतला देवी: ह्युमन कंप्यूटर' ठेवण्यात आले आहे. दैनिक दिव्य मराठी तुमच्यासाठी विद्याच्या फर्स्ट लूक एक्सक्ल्युजिव घेऊन आल आहे. विद्या सध्या लंडनमध्ये आहे. येथे चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. चित्रपटाची कास्ट अँड क्रू गेल्या आठवड्यातच तेथे गेली होती. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मी शकुंतला देवीमुळे प्रभावित झाले. त्यांची कथा खरचं अविश्वसनीय आहे. त्यांची कथा लोकांसमोर यायालाच हवी. त्या असाधारण महिला होत्या. काळाच्या पुढचा विचार करणारी आणि आपल्या अटीवर जगणारी ती महिला होती.
- अनु मेनन, डायरेक्टर


सर्व कमान महिलांच्या हाती
दिग्दर्शन अनु मेनन करणार आहे. याचे स्क्रीनप्ले तिने नयनिका महतानीसोबत मिळून लिहिले आहे. इशिता मोयत्रा या चित्रपटाची संवाद लेखक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन आणि मुख्य भूमिकेपासून ते सर्व काही महिलांच्या हाती आहे, महिलांनीच कमान सांभाळलेला हा पहिला चित्रपट ठरू शकतो.
मी त्यांना तीन वेळा भेटले, याचा मला आनंद आणि अभिमान आहे. त्या खूपच ग्रेट होत्या. त्यांचे काम लोकांसमोर आणायला हवे. आजच्या पीढीला त्यांच्या कौशल्याची माहिती व्हावी, त्यामुळे बायोपिक बनवण्याचा निर्णय घेतला. अशा महान लोकांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची संधी कमी मिळते.- स्नेहा रजानी, स्टडिओ हेड, सोनी पिक्चर्स


मानवी संगणक नावं कसं पडलं ?
१९७७ मध्ये शकुंतलाचा सामना डॅलस युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्यूटर 'युनिव्हॅक'शी झाला होता. शकुंतलाला 201 अंकाचा 23वे वर्गमूळ काढायचे होते. हे सोडविण्यासाठी त्यांना ५० सेकंद लागले. तर 'युनिव्हॅक'ने यासाठी ६२ सेकंद घेतले. तेव्हापासून शकुंतला जगभरात मानवी संगणक म्हणून ओळखली जाऊ लागली.


या चित्रपटात शकुंतला देवीची भूमिका साकारणाऱ्या विद्या बालनचा हा लूक पहिल्यांदाच समोर आला आहे.


कोण होत्या शकुंतला देवी
शकुंतला देवी यांना मानवी संगणक म्हणून ओळखले जाते. लहानपणापासून त्यांना गणित विषयाची आवड होती. त्या एक महान गणितज्ञ होत्या. १९८२ मध्ये त्यांच्या नावाची 'गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड' मध्ये नोंद करण्यात आली. शकुंतला देवी यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ मध्ये बँगलोरला एका ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांनी गणित आणि ज्योतिषशास्त्रावर पुस्तके लिहिली.


तीन वर्षाच्या असताना वडिलांनी ओळखली होती प्रतिभा
शकुंतला देवीचे वडील सर्कसमध्ये काम करत होते. तीन वर्षांच्या शकुंतलाला कार्डस ट्रिक शिकवताना त्यांनी त्यांची संख्या लक्षात ठेवण्याची क्षमता ओळखली आणि सर्कस सोडले. त्यानंतर शकुंतलाच्या प्रतिभेच्या बळावर त्यांनी रोड शो सुरू केले. ते तेथे त्यांची गणना करण्याची क्षमता दर्शवत असत. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी म्हैसूर विद्यापीठात अंकगणित क्षमता दाखवली. हे किस्से दाखवले जातील.

X