आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जयेशभाई शाह' चित्रपटात झळकणार आहे शालिनी पांडे, म्हणाली - 'दिग्दर्शकांनी संधी दिल्याने मी आज इथपर्यंत पाेहोचले'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'अर्जुन रेड्डी' सारख्या हिट चित्रपटात झळकलेली अभिनेत्री शालिनी पांडे आता बॉलीवूडमध्ये एक दिग्गज बॅनर यशराज फिल्म्ससोबत काम करत आहेे. टॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंतच्या आपल्या प्रवासाबाबत शालिनी सांगते, 'स्वप्ने पाहण्यासाठीच असतात. सिनेजगतात काहीही शक्य आहे. माझ्याकडे लोकांचे लक्ष गेले, हे भाग्यच म्हणाले लागेल. याबद्दल आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकेदिवशी मी माझ्या एका मित्रासोबत रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तिथे शानू शर्मा (यशराजच्या कास्टिंग डायरेक्टर) काही लोकांसोबत बसलेल्याा होत्या. रेस्टॉरंटमध्ये केवळ दोन लोकांसाठीच जागा उपलब्ध होती आणि ती शानू यांच्या बाजूलाच होती. खरं म्हणजे माझा टेबल त्यांच्या टेबलला लागूनच होता. त्या कदाचित एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करत असाव्यात. मला थोडे विचित्र वाटले आणि मी माझा टेबल तेथून हटवला. आम्ही दुसऱ्या टेबलवर बसलो आणि जेवण केले. एक किंवा दोन दिवसांनंतर पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली. अशाच प्रकारे एकदा मी दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे पुन्हा त्या दिसल्या. इथे पुन्हा एकही टेबल रिकामे नसल्यामुळे मी त्यांच्या शेजारीच जाऊन बसले. एकेदिवशी मी आपल्या इन्स्टाग्रामवर मेसेज पाहत होते. त्यांचा एक मेसेज मला मिळाला. खरे सांगायचे तर तो मेसेज पाहून मी उत्साहित झाले आणि मेसेज ओपन करण्याचा प्रयत्न केला. आता इन्स्टाग्राममध्ये परवानगी किंवा अस्वीकृतीचे एक फीचर आहे. तथापि, मी नकळत ओके केले आणि त्यांचा मेसेज डिलीट झाला. हा भ्रम होता की खरंच त्यांचा मेसेज माझ्यासाठीच आला होता, याबाबत मी बरेच दिवस विचार केला.'

शालिनी पुढे म्हणाली  'शानू यांच्याशी संपर्क करावा की नाही, याचा विचार मी पुढील ५-६ दिवस करत राहिले. मात्र, सुदैवाने याचदरम्यान त्यांच्या टीमकडून मला फोन आला आणि ते माझी एका चित्रपटासाठी ऑडिशन घेऊ इच्छितात, असे म्हणाले. ही ऑडिशन कोणत्या चित्रपटासाठी आहे, याची मला कोणतीच कल्पना नव्हती. तथापि, मी याबाबत खूप उत्सुक होते. मी ऑडिशनसाठी गेले आणि इतिहास झाला.'

संधी मिळाली हेच शालिनीचे भाग्य : मनीष शर्मा

'जयेशभाई जोरदार'चे निर्माते मनीष शर्मा सांगतात, 'चित्रपटासाठी नायिकेची निवड ही दीर्घ प्रक्रिया होती. स्क्रीनवरील हजेरी दमदार असेल अशाच अभिनेत्रीची गरज आम्हाला होती. कारण तिची जोडी रणवीरसोबत होणार होती. आम्ही शालिनीला भेटलो, हा योगायोगच म्हणावा लागेल. खरे म्हणजे आम्ही तीन मुलींची अंतिम निवड केली होती आणि दिव्यांगांसोबत त्यांचे प्रशिक्षणही सुरू झाले होते. त्याच वेळी मी शानूला म्हणालो, आता आपण मुलीचा शोध घ्यायचे न थांबवता आणखीही पर्यायांचा शोध सुरू ठेवला पाहिजे. त्यानंतर काही वेळातच शानूने माझी शालिनीसोबत भेट करून दिली. त्यानंतर तिने आपल्या ऑडिशन्सने आम्हा सर्वांना आकर्षित केले. ती सुंदर अभिनेत्री आहे. दिव्यांग आणि मी ज्या मुलीचा शोध घेत होतो, ती अखेर मिळाल्याने आम्ही आनंदी झालो. ती आमच्या चित्रपटासाठी सरप्राइज पॅकेज आहे. तिला प्रेक्षकांचे प्रेम आणि सहकार्य मिळेल, याबाबत आम्ही खूप अपेक्षा बाळगून आहोत.'

बातम्या आणखी आहेत...