आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेदनांमुळे रडत-लंगडत शाळेतून घरी येताच आईच्या पायावर कोसळली 7 वर्षांची चिमुरडी, तिची व्यथा ऐकूण आईदेखिल रडू लागली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेवाडी - येथे टॉकलेटचे आमीष दाखवून 38 वर्षांच्या व्यक्तीने 7 वर्षांच्या मुलीबरोबर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना मंगळवारी लोक नवरात्रीच्या पुजेमध्ये दंग असताना घडली. चिमुरडी शाळेतून घरी येत होती. त्याचवेळी आरोपीने तिला जाळ्यात अडकवले आणि सोबत नेले. वेदनेमुळे रजत लंगडत मुलगी घरी आली आणि आईच्या कुशीतच बेशुद्ध झाली. तिची अवस्था पाहून आईला संशय आला. रडणाऱ्या मुलीला शांत करत आईने कारण विचारले. नंतर कारण समजल्यानंतर आईदेखिल मुलीसारखीच रडू लागली. चिमुरडीने सांगितले की, अंकलने तिच्याबरोबर घाणेरडे काम केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 


ही घटना रेवाडीच्या खोल परिसरातील आहे. आरोपी राजूला पोलिसांनी रिमांडवर घेतले आहे. पीडित मुलीचे कुटुंब दीड महिन्यापूर्वीच दगड फोडण्याच्या मशीनवर काम करण्यासाठी याठिकाणी आले होते. मंगळवारी दुपारी मुलगी शाळेतून घरी येताना आरोपीने तिला जंगलात नेत हे कृत्य केले. घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मुलीला हॉस्पिटलला नेत वैद्यकीय चाचणी केली. त्यात मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...