आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूपेक्षा जास्त निष्ठूर निघाली आई, रक्त गोठावणारी थंडी सहन करु शकली नाही चिमुरडी, रुग्णालयात येताच सोडले प्राण, शरीरावर होता फक्त एक टी शर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाली(राजस्थान). बेटी बचाओ-बेटी पढाओमध्ये अग्रणी राहिलेल्या पाली जिल्ह्यातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी जिल्ह्याच्या नाडोल गावापासून 5 किलोमीटर अंतरावर एका महिन्याच्या मुलीला चादरीमध्ये गुंडाळून झाडांमध्ये फेकून देण्यात आले. सकाळी 11 वाजता मुलीच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने तिला नाडोल रुग्णालयात नेण्यात आले, येथून तिला पाली येथे पाठवण्यात आले. पालीमध्ये बांगड रुग्णालयात घेऊन येताच तिचा मृत्यू झाला. 


मुलीच्या निर्दयी आई-वडिलांविषयी कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, नाडेल-रानी रोड येथील वरकाना प्याऊजवळ सोमवारी सकाळी 11 वाजता झाडांमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. यानंतर गावकरी गोळा झाले. नाडोल पोलिस चौकीमध्ये याची सूचना देण्यात आली. सूचना मिळाल्यानंतर राणी स्टेशनचे अधिकारी चंदन सिंह भाटी घटनास्थळी पोहोचले आणि चिमुरडीला नाडोल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. येथे डॉ. वागाराम पटेलने मुलीला दाखल करुन तिच्यावर उपचार सुरु केले, पण तिची परिस्थिती सुधारत नसल्यामुळे तिला पाली येथील बांगड रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर या मुलीने प्राण सोडले. डॉक्टरांनुसार मुलीचे पुर्ण शरीर गार पडले होते आणि थंडीमुळे तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

 

माणुसकीला काळीमा फासणारी घटना 
6 डिग्री तापमान आणि कडाक्याच्या थंडीमध्ये आई-वडील मुलीला एका टी शर्ट आणि बेबी पँटमध्ये झाडांमध्ये सोडून गेले. कडाक्याच्या थंडीत तिच्या अंगावर स्वेटर किंवा गरम कपडाही नव्हता. 


रात्री थंडी 6 डिग्री असल्यामुळे चिमुरडी कोल्ड स्ट्रेसला बळी पडली 
बांगड रुग्णालयात आणताच मुलीने उल्टी केली आणि तिचा मृत्यू झाला. बाल रोग विशेषज्ञ डॉ. आर. के विश्र्नोईला बोलावण्यात आले, पण तोपर्यंत मुलीने प्राण सोडले होते. डॉ. विश्र्नोईने सांगितले की, मुलीचे पुर्ण शरीर गार पडले होते. जास्त काळ थंड ठिकाणी ती राहिली असे वाटत होते. थंडीमुळे तिच्या हार्ट आणि श्वास नलिकांवर प्रभाव पडला आणि यामुळेच तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

 

रक्त गोठावणारी थंडी सहन करु शकले नाही तिचे हृदय, पाली येताच रुग्णालयात सोडले प्राण 
डॉक्टरांनी सांगितले की, एक ते तीन वर्षांपर्यंतच्या मुलांचे शरीर थंडी सहन करण्यायोग्य नसतात. अशा वेळी मुलांना कमीत कमी 25 ते 28 डिग्री तापमान हवे असते. अन्यथा ते आजारी पडू शकतात. चिमुरडीला जंगलात फेकण्यात आले. तेव्हा रात्री 6 डिग्री तापमान होते आणि तिचे हृदय हे सहन करु शकले नाही. तिच्या नसांमधील रक्त गोठले आणि यामुळे तिचा मृत्यू झाला. 
 

बातम्या आणखी आहेत...