Home | Sports | From The Field | Shami developed the concept of 'intermediate fasting'; Fat decreased; Continuous bowling at 140+ speed

‘इंटरमिटेंट फास्टिंग’ची संकल्पना शमीने रुजवली; फॅट घटवले; सातत्याने १४०+ च्या वेगाने गाेलंदाजी

वृत्तसंस्था, | Update - Jun 22, 2019, 11:01 AM IST

फिटनेससाठी काेचचे अथक परिश्रम; फिटनेस प्रशिक्षक बाेस यांच्या प्रयाेगातून साकारले यश

 • Shami developed the concept of 'intermediate fasting'; Fat decreased; Continuous bowling at 140+ speed

  साऊथम्पटन - जगातील सर्वात फिट क्रिकेट संघ म्हणून टीम इंडियाची अाेळख अाहे. त्यामुळे या टीमच्या कामगिरी अाणि स्टॅमिनाची सर्वाधिक चर्चा असते. मात्र, हे सर्व काही तयार हाेण्यासाठी वर्ष-सहा महिन्यांचा कालावधी लागला, असे नाही. यासाठी तब्बल चार वर्षांपर्यंत प्रचंड मेहनत घ्यावी लागली. या माेहिमेला गत विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर लगेच सुरुवात करण्यात अाली. सीनियर खेळाडू अाणि सपाेर्ट स्टाफ यांनी ठरवून एक माेठा निर्णय घेतला. यात फलंदाजी, गाेलंदाजी, फिल्डिंगसारखीच फिटनेसवरही प्रचंड मेहनत घ्यायची.

  विराटवर : असा विद्यार्थी, गुरूसाठी गुडलक

  काेहलीसारखा शिष्य मिळणे, हे गुरूचे नशीब मानले जाते. ताे सर्वात बाेअरिंग एक्सरसाइजही वर्षातील ३६५ दिवस करण्यास तयार असताे. ट्रेनिंगच्या वेळी काेहली हा १०० प्रश्न विचारताे. मात्र, एकदा उत्तर मिळाल्यानंतर त्याला पुन्हा माेटिव्हेट करण्याची गरज पडत नाही. ताे स्वत:ही अापल्या शरीराची काळजी घेताे.

  परिणाम : विराट काेहली हा जगात सर्वात फिट क्रिकेटपटू.

  शमी : वैयक्तिक अडचणींतून सकारात्मक बदल

  अायुष्यात अडचणी आल्या. त्याने धाडसाने सामना केला. त्यामुळे त्याचे अवघे अायुष्यच बदलून गेले. त्याने फिटनेसवर भर दिला. त्याने बाॅडी फॅट कमी झाला. कसाेटीच्या शेवटच्या दिवशी सर्व जण थकलेले असतानाही शमीच्या गाेलंदाजीची स्पीड १४०+ ची असते.

  परिणाम : शमीने यंदा अनफिटमुळे कसाेटी सामना मिस केला नाही.

  तयारीसाठी : फिटनेसचा अर्थ लाइफस्टाइल
  १० ते १५ दिवसांचा कॅम्प अटेंड व सर्व काही झाले, असा फिटनेसचा अर्थ हाेत नाही. ही खेळाडूची लाइफस्टाइल असते. अाॅलिम्पियन खेळाडूसारखा फिटनेस हवा, याच उद्देशाने कार्यरत असताे. अाम्ही ट्रेंनिग, स्लीप सायकल व न्यूट्रिशन या तीन गाेष्टी महत्त्वाच्या मानताे.

  निकाल : टीमचा प्रत्येक खेळाडू याे-याे टेस्टमध्ये पास झाला.

  वेगळे ट्रेनिंग शेड्यूल : जसा फॅट, तसा डाएट

  जेवण काहीसाठी फायदेशीर व तर काहींवर परिणाम करणे असते. त्यानुसर जसा फॅट असेल, तसा डाएट देण्याचा निर्णय घेण्यात अाला. यातूनच सर्वांच्या फॅटची चाचणी केली जाते.

  परिणाम : सर्वाधिक भात खाणारा विजय शंकर टीमचा चांगला खेळाडू.

Trending