आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशॅम्पूमध्ये असे अनेक रासायनिक पदार्थ असतात, ज्यामुळे केसांना नुकसान पोहोचते. शॅम्पू करताना यामध्ये काही नैसर्गिक पदार्थांंचे थेंब टाकल्याने रसायनाचा प्रभाव कमी होतो. यामुळे केसांच्या अनेक समस्यांपासून बचाव होतो. सौंदर्यतज्ञ अफरोज अली सांगत आहेत अशाच १० पदार्थांविषयी...
हे शॅम्पूमध्ये मिसळा होईल जास्त प्रभावी
लिंबूचा रस : शॅम्पूमध्ये लिंबूचा रस मिसळल्याने कोंडा सहज दूर होतो.
मध : शॅम्पूमध्ये मध मिसळून लावल्याने केस गळणे पूर्णपणे बंद होते.
आवळ्याचा रस : हे शॅम्पूसोबत मिक्स केल्याने कोंडा पूर्णपणे दूर होतो.
गुलाब जल : शॅम्पूमध्ये हे मिक्स करुन लावल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो.
ग्रीन टी : शॅम्पूमध्ये ग्रीन टी मिसळल्याने केस गळणे थांबते. यामुळे केस दाट होतात.
एलोवेरा ज्यूस : शॅम्पूमध्ये एलोवेरा ज्यूस मिसळून लावल्याने खाज दूर होते.
ऑलिव्ह ऑइल : हे शॅम्पूमध्ये मिसळून लावल्याने केसांची चमक वाढते.
बारीक केलेली साखर : शॅम्पूसोबत हे मिसळून लावल्याने केस मुलायम,चमकदार होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.