आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Shane Warne And Wasim Akram Are Blown Away By This 6 Year Old Pakistani Boy

Video: चिमुरड्याचा खेळ पाहून हैराण झाले क्रिकेटर शेन वॉर्न आणि वसीम अक्रम, ट्वीटरवर सल्लाही दिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - पाकिस्तानच्या एलीच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. विशेष म्हणजे, एलीची गोलंदाजी पाहून दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न आणि वसीम अक्रम यांनीही कौतुक केले आहे. शेन वॉर्नने या सहा वर्षाच्या मुलाचे कौतुक करताना त्यात स्वतःला पाहत असल्याचे म्हटले आहे. 


लेग स्पिनर शेन वॉर्नच्या गोलंदाजीला मोठे मोठे फलंदाज घाबरत होते. टेस्ट आणि वन डे मधील विक्रम त्याचे साक्षीदार आहेत. वॉर्नने टेस्टमध्ये 708 विकेट्स घेतल्या आहेत आणि वनडेमध्ये 293 विकेट घेतल्या आहेत. पण पाकिस्तानचा 6 वर्षांचा एली मिकल अगदी हुबेहूब वॉर्नसारखी गुगली, फ्लिपर, लेग ब्रेक गोलंदाजी करतो. त्याची अॅक्शनही शेन वॉर्नची आठवण करून देतात. 


सोशल मीडियावर एलीच्या गोलंदाजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटू त्याचे कौतुक करत आहेत. वसीम अक्रम, विराट कोहली आणि शेन वॉर्न त्याचे कौशल्य पाहून हैराण आहेत. 6 वर्षाच्या मुलाची गोलंदाजी पाहून वॉर्नने ट्विटरवर लिहिले - खरंच अविश्वनीय, मुलाच्या हातून ज्याप्रकारे चेंडू निघत आहे तेही एवढ्या कमी वयात हे आश्चर्यकारक आहे. फक्त एक सल्ला आहे, बॉलिंग आर्म थोडा आणखी वर हवा. 


सोबतच पाकिस्तानचा गोलंदाज वसीम अक्रमनेही एलीचे कौतुक केले. ते म्हणाले, हा मुलगा, आपल्या देशात खरंच हुशार मुले आहेत. पण त्यांच्याकडे कौशल्य दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ नाही. आता वेळ आली आहे की, या मुलांसाठी आपण काहीतरी करायला हवे. एलीही शेन वॉर्नचा सल्ला मिळाल्याने आनंदी आहे. तो त्यानुसार गोलंदाजीत सुधार करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...