आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्नने केले कोहलीचे कौतुक, म्हणाला-त्याच्यामुळे मालिका रोमांचक बनली, तो या ग्रहावरील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय कर्णधार विराट कोहली याचे चाहते जगभरात आहे. खेळासाठी त्याची निष्ठा आणि पॅशन यामुळे इतर क्रिकेटपटुंपेक्षा तो वेगळा ठरतो. पण आता कोहलीचे कौतुक करणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार शेन वॉर्नचा समावेश आहे. ब्रेट लीबरोबरचा एक व्हिडिओ वॉर्नने शेअर केला आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेली ही सिरीज कोहलीमुळेच रोमांचक बनत आहे. त्याच्यामुळेच सिरीज 1-1 च्या बरोबरीवर आहे. तो याग्रहावरील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. 


कोहलीने अॅडिलेड कसोटीच्या पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 34 धावा केल्या होत्या. तर पर्थ कसोटीत त्याने कसोटीतील 25वे शतक करत 123 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या मातीवर त्याचे हे सहावे शकत होते. पण दुसऱ्या डावात त्याला फार कमाल करता आली नाही. तो 17 धावांवर बाद झाला होता. 


वॉर्नने केले मेलबर्नचे कौतुक 
मेलबर्नमध्ये भारत ऑस्ट्रेलियामध्ये तिसरी कसोटी खेळली जात आहे. वार्नने हे शहर जगाची क्रीडा राजधानी असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला मला या शहरावर प्रेम आहे. 80 हजारांहून अधिक क्रीडा चाहते येथे येतात. लाखो लोक टीव्हीवर पाहतात आणि रेडिओवर ऐकतात. या मैदानानेच ऑस्ट्रेलिया क्रिकेटची परंपरा पुढे नेली आहे. 

बातम्या आणखी आहेत...