Home | Sports | From The Field | shane warne statue on mca ground

एमसीजीच्या मैदानावर बसवला जाणार शेन वॉर्नचा पुतळा

Agency | Update - May 31, 2011, 01:12 PM IST

मेलबर्न क्रिकेट क्लबच्या एमसीजी मैदानावर शेन वॉर्नचा मोठा पितळाचा पुतळाही बसवला जाणार आहे.

  • shane warne statue on mca ground

    shane_258मेलबर्न - यंदाच्या चौथ्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून चमकदार कामगिरी करणार्‍या शेन वॉर्नचा सर्वोत्कृष्ट महान पहिल्या 10 खेळाडूंमध्ये समावेश होणार आहे. यातूनच मेलबर्न क्रिकेट क्लबच्या एमसीजी मैदानावर शेन वॉर्नचा मोठा पितळाचा पुतळाही बसवला जाणार आहे.

    41 वर्षीय शेन वॉर्न याने आंतरराष्ट्रीय आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एमसीजीला भेट दिली. यावेळी मूर्तिकार लुई लामेन यांची वॉर्नने भेट घेतली. आयपीएलसह 145 कसोटी सामन्यात 708 बळीचा विश्वविक्रम करणार्‍या वॉर्नचा पुतळा बसवण्यासाठी लुई लामेन यांनी माप घेतले आहे.येत्या वर्षभरात वॉर्नचा मेलबर्न क्रिकेट क्लबच्या मैदानावर पितळाचा पुतळा बसवला जाणार आहे.Trending