आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 मे रोजी सूर्य आणि चंद्र राहतील मेष राशीमध्ये, चंद्राच्या सोळाव्या कलेला म्हणतात अमा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शनिवार, 4 रोजी वैशाख मासातील अमावस्या आहे. शनिवारी ही तिथी आल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. पंचांगामध्ये एक महिन्याला 15-15 दिवसांच्या दोन पक्षांमध्ये विभागण्यात आले आहे. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षामध्ये चंद्राची कला पूर्ण रूप घेते आणि कृष्ण पक्षामध्ये चंद्र कलांचा क्षय होतो. काही मतमतांतरानुसार काही लोक शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी किंवा प्रतिपदा तिथीला महिन्याची सुरुवात करतात, तर काही लोक कृष्ण पक्षातील पहिल्या दिवसाला मासारंभ मानतात. या क्रमामध्ये कृष्ण पक्षातील पंधरावा दिवस किंवा शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात.


धर्मग्रंथामध्ये चंद्राच्या सोळाव्या कलेला 'अमा' सांगण्यात आले आहे. स्कंद पुराणातील श्लोकानुसार
अमा षोडशभागेन देवि प्रोक्ता महाकला।
संस्थिता परमा माया देहिनां देहधारिणी ।।

अर्थ - चंद्रमंडळातील अमा नावाची महाकला आहे, ज्यामध्ये चंद्राच्या सोळा कलांची शक्ती आहे. या शक्तीचा क्षय आणि उदय होत नाही. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास सूर्य आणि चंद्राच्या मिलन काळाला अमावस्या म्हणतात. या दिवशी सूर्य आणि चंद्र एकत्र राहतात. यामुळे शास्त्रामध्ये या तिथीची विविध नावे सांगण्यात आली आहेत - सूर्य-चंद्र संगम, पंचदशी. अमावासी. अमावासी किंवा अमामासी.


- ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्र ज्या दिवशी एकत्र असत त्या दिवशी अमावस्या असते. या दिवशी हे दोन्ही ग्रह एकत्र एकाच राशीमध्ये असतात म्हणजेच या दिवशी दोन्ही ग्रहांचे मिलन होते. 4 मे रोजी सूर्य आणि चंद्र दोघेही एकत्र मेष राशीमध्ये स्थित राहतील.


- शास्त्रामध्ये अमावस्या तिथीचे स्वामी पितृदेव यांना मानण्यात आले आहे. यामुळे या दिवशी पितरांच्या तृप्तीसाठी तर्पण, दान-पुण्य करण्याचे महत्त्व आहे.


- या योगामध्ये तीर्थस्नान, जप, तप, व्रत पुण्याने कर्ज आणि विविध पापामधून मुक्ती मिळते. त्यामुळे हा काळ संयम, साधना आणि तप करण्यासाठी श्रेष्ठ मानला जातो.

बातम्या आणखी आहेत...