आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shani Amavasya On 5th January, Worship Of Shani Dev

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोखंडाच्या कलशात स्थापन करावी शनिदेवाची मूर्ती, पूजेनंतर ब्राह्मणाला दान करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वेळी मार्गशीर्ष मासातील अमावास्या 5 जानेवारी, शनिवारी आहे. शनिवारी अमावास्या योग आल्यामुळे ही शनिश्चरी अमावस्या मानली जाते. या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा केली जाते आणि व्रत ठेवले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्‌ट यांच्यानुसार जाणून घ्या, शनिश्चरी अमावास्येला कशाप्रकारे करावी शनिदेवाची पूजा आणि व्रत...


अमावास्येला या विधीनुसार करावी शनिदेवाची पूजा
- शनिवारी सकाळी लवकर स्नान केल्यानंतर एका लोखंडाच्या कलशामध्ये मोहरीचे किंवा तिळाचे तेल टाकून त्यामध्ये शनिदेवाची लोखंडाची मूर्ती स्थापन करा. 


- कलशाला काळ्या कपड्याने झाकून ठेवा.  या कलशाला शनिदेवाचे रूप मानून षोड्शोपचार(आवाहन, स्थान, आचमन, स्नान, वस्त्र, चंदन, अक्षता, फूल, धूप-दीप, यज्ञोपवित(जानव), नैवेद्य,पान, दक्षिणा, श्रीफळ, निरांजन) पूजा करा.


- षोड्शोपचार मंत्र माहिती नसेल तर या मंत्राचा उच्चार करा...
ऊँ शन्नो देवीरभिष्टय आपो भवंतु पीतये।
शंय्योरभिस्त्रवन्तु न:।।
ऊँ शनिश्चराय नम:।।


- पूजेमध्ये मुख्यत्वे काळे, निळे गुलाबाचे फुलं, नीलकमल, खिचडी (तांदूळ किंवा मुगाची) अर्पण करा. 


- त्यानंतर पूजा सामग्रीसहित शनिदेवाचे प्रतिक कलश(मूर्ती, तेल, कापड) योग्य ब्राह्मणाला दान करा. 


- अशा प्रकारे पूजा करून दिवसभर उपवास करा आणि यथाशक्ती खालील मंत्राचा जप करा...
ऊँ शं शनिश्चराय नम:।