आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमावास्येला काय करावे आणि काय करू नये, लक्षात ठेवा या 6 गोष्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 5 जानेवारीला मार्गशीर्ष मासातील अमावस्या आहे. पंचांगानुसार एक महिना 15-15 दिवसांच्या दोन पक्षांमध्ये विभाजित असतो. एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षात चंद्राच्या कला वाढत जातात आणि कृष्ण पक्षात कमी होतात यामुळे अमावास्येला चंद्र पूर्णपणे अदृष्ट होतो.


धर्मग्रंथामध्ये चंद्राच्या सोळाव्या कलेला 'अमा' सांगण्यात आले आहे. स्कंद पुराणातील श्लोकानुसार
अमा षोडशभागेन देवि प्रोक्ता महाकला।
संस्थिता परमा माया देहिनां देहधारिणी ।।

अर्थ - चंद्रमंडळातील अमा नावाची महाकला आहे, ज्यामध्ये चंद्राच्या सोळा कलांची शक्ती आहे. या शक्तीचा क्षय आणि उदय होत नाही. 


अमावस्या तिथी संदर्भात काही खास गोष्टी...
- ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्र ज्या दिवशी एकत्र असत त्या दिवशी अमावस्या असते. या दिवशी हे दोन्ही ग्रह एकत्र एकाच राशीमध्ये असतात म्हणजेच या दिवशी दोन्ही ग्रहांचे मिलन होते. 5 जानेवारीला सकाळी सूर्य आणि चंद्र हे दोन्ही ग्रह एकत्र धनु राशीमध्ये राहतील.


- शास्त्रामध्ये अमावस्या तिथीचे स्वामी पितृदेव यांना मानण्यात आले आहे. यामुळे या दिवशी पितरांच्या तृप्तीसाठी तर्पण, दान-पुण्य करण्याचे महत्त्व आहे.


- या व्यतिरिक्त शनिवार आणि चतुर्दशी योगही विशेष फळ प्राप्त करून देणारे मानले गेले आहेत. या योगामध्ये तीर्थस्नान, जप, तप, व्रत पुण्याने कर्ज आणि विविध पापामधून मुक्ती मिळते. त्यामुळे हा काळ संयम, साधना आणि तप करण्यासाठी श्रेष्ठ मानला जातो.


अमावस्या पयोव्रत - या व्रतामध्ये केवळ दुध ग्रहण केले जाते. भगवान विष्णूची आराधना केली जाते. हे व्रत एकवर्ष केले जाते. या व्रताने तन, मन आणि धनाच्या कष्टातून मुक्ती मिळते.


अमावस्या व्रत- कर्म पुराणानुसार या दिवशी महादेवाची उपासना केल्यास गंभीर आजारातून मुक्ती मिळते.