Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Shani Changing On 6 September horoscope

6 सप्टेंबरपासून वक्री शनी धनु राशीमध्ये मार्गी, या पाच राशींवर राहील सर्वात जास्त प्रभाव

रिलिजन डेस्क | Update - Sep 04, 2018, 03:46 PM IST

गुरुवार 6 सप्टेंबरपासून शनी चाल बदलत आहे. शनी आतापर्यंत वक्री म्हणजे उलटे चालत होते परंतु आता हा ग्रह सरळ चालेल.

 • Shani Changing On 6 September horoscope

  गुरुवार 6 सप्टेंबरपासून शनी चाल बदलत आहे. शनी आतापर्यंत वक्री म्हणजे उलटे चालत होते परंतु आता हा ग्रह सरळ चालेल. या परिवर्तनाचा प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर सर्वात जास्त पडेल. सध्या शनी धनु राशीमध्ये आहे. यामुळे वृषभ आणि कन्या राशीवर ढय्या चालू आहे. वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर साडेसातीचा प्रभाव आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, या पाच राशींवर आता कसा राहील शनीचा प्रभाव...


  वृषभ राशी
  > या राशीवर शनीची ढय्या चालू आहे. नोकरदार लोकांच्या कामाच्या ठिकाणात बदल होण्याचे योग जुळून येत आहेत.


  > बदल विचारपूर्वक केल्यास चांगले राहील. अचानक कोणताही निर्णय घेऊ नये, अन्यथा मोठ्या अडचणीत सापडू शकता.


  > एखादे नवीन काम सुरु करू शकता. नवीन योजना तयार होतील आणि त्यावर कामही सुरु कराल. आर्थिक स्थिती संदर्भात संघर्ष करावा लागू शकतो.


  कन्या राशी
  > शनीच्या ढय्यामुळे निवास स्थान बदलण्याचे योग जुळून येत आहेत. प्रवासाचेही योग जुळून येत आहेत.


  > तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मानसिक स्वरूपात शांत राहण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा नुकसान होऊ शकते.


  > कामाच्या व्यापामुळे स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. कर्जापासून दूर राहावे.

  वृश्चिक
  > या राशीवर सध्या साडेसाती चालू आहे. शनीमुळे कौटुंबिक जीवनात उलथा-पालथ होऊ शकते. वादाची स्थिती निर्माण होऊ शकते.


  > कुटुंबापासून दूर राहावे लागू शकते. नोकरी आणि बिझनेसमध्ये एक्स्ट्रॉ मेहनत करून तुम्हाला चांगले फळ प्राप्त होऊ शकते. इन्कम वाढू शकते.


  > नोकरी करणाऱ्या लोकांना पुढे जाण्याची संधी मिळेल. या काळात उत्पन्न वाढेल परंतु तुम्ही फार सेव्हिंग करू शकणार नाहीत.

 • Shani Changing On 6 September horoscope

  धनु 
  > या राशीमध्ये शनी असून राशीवर साडेसातीचा प्रभाव आहे. शनीमुळे तुमच्या कष्टाचे फळ इतरांना मिळू शकते.


  > मानसिक तणाव आणि अडचणी वाढू शकतात. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नये. कामाचा व्याप जास्त असल्यामुळे तणाव वाढू शकतो.


  > विचार न करता बोलल्याने काम बिघडू शकते. आरोग्याच्या बाबतीत सावध राहावे लागेल.

 • Shani Changing On 6 September horoscope

  मकर 
  > तुमच्यावर साडेसातीचा प्रभाव राहील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात.


  > कायदेशीर प्रकरण आणि वाद अडकू शकतात. नोकरी किंवा बिझनेसमध्ये बदल होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात.


  > महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे आणि उशीर होईल. हानी होण्याची शक्यता आहे. खर्च वाढू शकतात. विदेश प्रवासाचे योग जुळून येत आहेत.

Trending