Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Shani Changing On 6 September In Dhanu Rash

सावधान : न्यायाधीश शनिदेव आता मार्गी, 12 राशींवर असा राहील प्रभाव

रिलिजन डेस्क | Update - Sep 06, 2018, 12:02 AM IST

6 सप्टेंबर, गुरुवारपासून शनी धनु राशीमध्ये मार्गी झाला आहे. यापूर्वी शनी ग्रह वक्री म्हणजे उलटा चालत होता.

 • Shani Changing On 6 September In Dhanu Rash

  6 सप्टेंबर, गुरुवारपासून शनी धनु राशीमध्ये मार्गी झाला आहे. यापूर्वी शनी ग्रह वक्री म्हणजे उलटा चालत होता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार शनी सध्या धनु राशीमध्ये आहे. यामुळे वृषभ आणि कन्या राशीवर ढय्या तर वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर साडेसाती चालू आहे. ढय्याचा प्रभाव अडीच वर्ष तर साडेसातीचा प्रभाव साडे सात वर्ष चालतो. शनी 24 जानेवारी 2020 पर्यंत धनु राशीमध्ये राहील. त्यानंतर मकर राशीत प्रवेश करेल. येथे जाणून घ्या, शनीचे हे परिवर्तन तुमच्यासाठी कसे राहील...


  मेष : कार्यक्षेत्रासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. नोकरदार लोक जॉब बदलण्याच्या विचारात असल्यास हा काळ चांगला आहे. फायदा आणि यश दोन्ही गोष्टी प्राप्त होतील. बिझनेसमध्येही लाभ होऊ शकतो. नवीन लोकांच्या ओळखी होतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. एखादा व्यक्ती धोका देण्याचा प्रयत्न करू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. एखादे इन्फेक्शन किंवा औषधींचा साइड इफेक्टसुद्धा होऊ शकतो.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा काळ...

 • Shani Changing On 6 September In Dhanu Rash

  वृषभ : नोकरदार लोकांच्या कामामध्ये किंवा जागेमध्ये बदल होण्याचे योग आहेत. अचानक कोणताही निर्णय घेऊ नये, अन्यथा मोठ्या अडचणीत पडू शकता. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. एखादे नवीन काम सुरु करू शकता. नवीन काही प्रयोगही करू शकता. यामध्ये यश प्राप्त होऊ शकते. डोळे, कान, नाक आणि गळ्याशी संबंधित त्रास होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्ती तुमच्या हातातून निघून जाऊ शकते. नवीन लोकांच्या ओळखी होतील. उत्पन्न वाढवण्यासाठी जास्तीचे काम करावे लागेल.

 • Shani Changing On 6 September In Dhanu Rash

  मिथुन : पार्टनशीपमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ ठीक नाही. धैर्य बाळगल्यास फायदा होईल, अन्यथा अडचणी वाढू शकतात. राजकारण किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांनी सावध राहावे. व्यर्थ आरोप लागण्याचे योग जुळून येत आहेत. शेअर मार्केट, कमोडिटी, सट्टेबाजीपासून दूर राहावे. पत्नीमुळे भाग्यवृद्धी होऊ शकते. आईच्या तब्येतीमुळे धावपळ करावी लागू शकते. दाम्पत्य जीवनात महत्त्वाचे बदल घडतील. अविवाहित लोकांचा लग्नाला आणखी उशीर होऊ शकतो. कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्या विरोधात जाऊ शकतो. घर घेण्याच्या विचारात असाल तर यशस्वी व्हाल.

 • Shani Changing On 6 September In Dhanu Rash

  कर्क - नोकरदार लोकांना कामामध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते. काही लोकांची भागीदारी तुटू शकते. या काळात कर्जातून मुक्ती मिळेल. बिझनेसमध्ये शत्रूंवर विजय प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. व्यर्थ खर्चापासून दूर राहावे. महत्त्वाच्या कामामध्ये उशीर होऊ शकतो. कुटुंबामध्ये एखाद्या मुद्यावरून मतभेद निर्माण होऊ शकतात. कर्क राशीपासून शनी गोचरमध्ये सहाव्या स्थानात राहील. सहावे स्थान रोग, दुःख, ऋण, शत्रू इत्यादींचे स्थान असल्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबधित अडचण निर्माण होऊ शकते. एखादा गंभीर आजार होऊ शकतो. 

 • Shani Changing On 6 September In Dhanu Rash

  सिंह : नवीन बिझनेस करून इच्छित असाल तर पार्टनशीपची ऑफर मिळू शकते. धन लाभाच्या चिंतेने ग्रस्त राहाल. धनलाभ होईल परंतु यासाठी धैर्य बाळगणे आवश्यक आहे. नोकरदार लोकांचा तणाव वाढू शकतो. लव्ह मॅरेजचे योग जुळून येत आहेत परंतु काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. प्रेम-प्रसंगासाठी हा काळ चांगला राहील. उप्तन्न वाढू शकते. बँक किंवा इतर संस्थेकडून घेतलेले कर्ज परत कराल. खांद्याचा त्रास होऊ शकतो. गरोदर महिलांनी सांभाळून राहावे.

 • Shani Changing On 6 September In Dhanu Rash

  कन्या : निवासस्थान बदलण्याचा किंवा एखाद्या नवीन ठिकाणी शिफ्ट होण्याचा विचार करू शकता. प्रवासाचे योग जुळून येत आहेत. रागावर नियंत्रण ठेवावे. कामाचा व्याप वाढल्यामुळे स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. आरोग्यकडे दुर्लक्ष करू नये. वरिष्ठांची मदत मिळेल. जुने शत्रू तुमच्या अडचणी वाढवू शकतात. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, कमोडिटीमध्ये विचारपूर्वक गुंतवणून करावी. अपत्यांचे सुख मिळेल.

 • Shani Changing On 6 September In Dhanu Rash

  तूळ : साडेसातीपासून मुक्ती मिळेल. अडचणींपासून दूर राहाल. तुमच्यासाठी हा काळ चांगला राहील आणि शत्रूंवर विजय प्राप्त कराल. या काळात तुम्हाला कष्टाचे पूर्ण फळ मिळेल. कामाच्या बाबतीत थोडेसे सावध राहावे. धनलाभाची शक्यता आहे. प्रॉपर्टीशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकता. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहेत. फायदा करून देणाऱ्या काही घटना घडतील. अडकलेला पैसा मिळेल.

 • Shani Changing On 6 September In Dhanu Rash

  वृश्चिक : शनीमुळे कौटुंबिक जीवनात उलथापालथ होऊ शकते. वाद आणि कलहाची स्थिती निर्माण होऊ शकते. कुटुंबापासून दूर जावे लागेल. नोकरी आणि बिझनेसमध्ये जास्तीचे कष्ट केल्याने उत्तम फळ प्राप्त होऊ शकते. तुमचे उत्पन्नही वाढेल. करिअरमध्ये पुढे जाण्याची सुवर्ण संधी चालून येईल. व्यर्थ खर्च वाढण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला पद आणि सन्मान मिळू शकतो. आरोग्यामध्ये सुधार होईल परंतु एखादी छोटी-मोठी जखम, दुर्घटना होण्याची शक्यता आहे. सांभाळून राहावे.

 • Shani Changing On 6 September In Dhanu Rash

  धनु : या काळात तुम्ही पैसे मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार राहाल. तुम्ही तुमच्या पराक्रमाच्या बळावर बिझनेस वाढवाल. भागेदारीत एखादे काम अवश्य करू शकता. या काळात सेव्हिंग आणि उत्पन्न वाढवण्याची संधी तुम्हाला मिळेल. नोकरी आणि बिझनेसमध्ये करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे फायदा होईल. बेरोजगार लोकांना नोकरी मिळेल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. मानसिक तणाव आणि अडचणी वाढू शकतात. धर्म आणि अध्यात्मावरील विश्वास वाढेल. दाम्पत्य सुखांमध्ये कमतरता येऊ शकते. किडनी आणि शुगरची तपासणी करून घ्यावी.

 • Shani Changing On 6 September In Dhanu Rash

  मकर - तुम्हाला शनीची साडेसाती सुरु झाली आहे. नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्च वाढू शकतो. विदेश प्रवासाचे योग आहेत. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. कायदा आणि वादामध्ये अडकू शकता. नोकरी किंवा बिझनेसमध्ये बदल घडू शकतात, यामुळे तुमच्या अडचणी वाढतील. पैसा बुडण्याचे योग आहेत. जुने आजार पुन्हा त्रास देतील. ऑपरेशन करावे लागू शकते. धार्मिक कार्यामध्ये रुची वाचेल.

 • Shani Changing On 6 September In Dhanu Rash

  कुंभ : नोकरी आणि बिझनेससाठी हा काळ चांगला राहील. कामामध्ये बदल घडू शकतात. काही निर्णयांमुळे मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. तुमचे उत्पन्न वाढेल. कामाच्या ठिकाणी पुढे जाण्याची संधी मिळेल. सुखी आयुष्यासाठी जे नियोजन केले होते, त्यावर काम सुरु कराल. एखाद्या जुन्या आजारातून मुक्ती मिळेल. संपत्तीशी संबंधित वाद असल्यास तो सोडवण्याचा प्रयत्न करा. यश प्राप्त होईल. मान-सन्मान मिळेल.

 • Shani Changing On 6 September In Dhanu Rash

  मीन : शनीमुळे तुमच्या कामाची गती मंद होईल. नोकरी आणि बिझनेसमध्ये घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. नवीन काम सुरु करण्यापूर्वी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. आईच्या तब्येतीमुळे चिंताग्रस्त राहाल. घर, वाहन किंवा एखाद्या संपत्तीसाठी तुमचा खर्च होऊ शकतो. या काळात तुम्हाला कर्जही घ्यावे लागू शकते. बेरोजगार लोकांसाठी हा काळ चांगला आहे. नोकरी किंवा बिझनेस सुरु होऊ शकतो.

Trending