Home | Jeevan Mantra | Dharm | Shani Dev And Traditions Mythological Tips

केवळ तेल अर्पण केल्याने अन् पूजा केल्याने प्रसन्न होत नाहीत शनिदेव, ही 10 कामेही आवश्यक

रिलिजन डेस्क | Update - Sep 06, 2018, 05:32 PM IST

गुरुवार, 6 सप्टेंबरला शनिदेवाने चाल बदलली आहे. सहा सप्टेंबरपासून शनी धनु राशीमध्ये मार्गी झाला आहे.

 • Shani Dev And Traditions Mythological Tips

  गुरुवार, 6 सप्टेंबरला शनिदेवाने चाल बदलली आहे. सहा सप्टेंबरपासून शनी धनु राशीमध्ये मार्गी झाला आहे. काही लोकांसाठी शनीची ही स्थिती अडचणी वाढवणारी ठरू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तेलाचे दान करावे आणि शनिदेवाला तेल अर्पण करावे. परंतु या उपायांसोबतच आणखी काही खास काम दैनंदिन जीवनात करणे आवश्यक आहेत. अन्यथा पूजेचे शुभफळ प्राप्त होत नाहीत आणि जीवनात अडचणी कायम राहतात. येथे जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे काम...


  1. आपली आई तसेच इतर सर्व स्त्रियांचा सन्मान करावा. कोणत्याही स्थितीमध्ये महिलांचा अपमान करू नये, अन्यथा कोणत्याही पूजन कर्माचे फळ प्राप्त होणार नाही.


  2. इतरांचे धन बळकावण्याचा प्रयत्न करणेसुद्धा पाप आहे. यापासून दूर राहावे. स्वतःच्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे धन मिळवावे.


  3. वेळोवेळी स्वतःचे चप्पल-बूट दान करत राहावेत. पायांमध्ये शनीचा वास मानण्यात आला आहे. यामुळे पायांशी संबंधित वस्तू दान केल्याने शनी दोष दूर होऊ शकतात.


  4. सकाळ-संध्याकाळ स्वयंपाकातील शेवटची पोळी श्वानासाठी काढून ठेवावी. काळ्या रंगाचे श्वान नसल्यास कोणत्याही श्वानाला खाऊ घालावी.


  5. रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.


  6. प्रत्येक शनिवारी तेलाचे मालिश करून नंतर स्नान करावे. यामुळे त्वचेची चमक वाढते आणि शनिदोष दूर होतात.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार कामे...

 • Shani Dev And Traditions Mythological Tips

  7. एखाद्या मंदिरात तिळाचे तेल दान करावे. हे काम शनिवारी अवश्य करावे.


  8. सहकर्मी आणि आपल्या हाताखाली असलेल्या लोकांचा अधिकार हिसकावून घेऊन नये. इतरांच्या वाट्याचे धन त्यांना परत करावे.

 • Shani Dev And Traditions Mythological Tips

  9. रोज थोडावेळ शरीरातून घाम निघेल असे शारीरिक श्रम करावेत. यामुळे शरीरातून घाण बाहेर पडेल आणि श्रम करणाऱ्या लोकांवर शनिदेव प्रसन्न राहतात.


  10. एखाद्या मंदिरात पिंपळाचे झाड लावून त्याची निगा राखावी.

Trending