आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या लोकांना शनिदेवामुळे होणार लाभ, घरात राहील सुख-शांती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष 2019 मध्ये सर्व राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव जास्त राहील. 33 दिवस अस्त राहिल्यानंतर 19 जानेवारीला शनी ग्रहाचा पुन्हा उदय झाला आहे. यानंतर आता 27 डिसेंबरपर्यंत शनिदेव दिव्य स्वरूपात राहणार म्हणजेच वर्षभर यांचा प्रभाव दिसून येईल. शनी 30 एप्रिलला वक्री होईल. यामुळे 30 एप्रिलपर्यंत शनिदेवाचा प्रभाव जास्त राहील. शनीमुळे जास्त मेहनत करणाऱ्या लोकांना लाभ होईल, धर्मानुसार काम करणाऱ्या लोकांच्या घर-कुटुंबात सुख-शांती राहील. बेरोजगारांना काम मिळू शकते.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बावाला यांच्यानुसार 15 डिसेंबर 2018 ला शनिदेव अस्त झाले होते. 33 दिवसानंतर 19 जानेवारी 2019 ला सकाळी 8.28 ला उदय झाले. शनिदेवाच्या उदयामुळे शुभ कार्यामध्ये गती येईल. हा ग्रह 27 डिसेंबर 2019 पर्यंत दिव्य अवस्थेमध्ये राहील.


कसा राहील शनिदेवाचा प्रभाव 
> शनिदेव आपल्या कार्याची ऊर्जा वाढवतात. प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या लोकांचा भाग्योदय करतात. शनी मार्गी आणि वक्री झाल्यामुळे वर्षाच्या मध्यात प्रभाव जास्त राहील. वर्तमानात शनी धनु राशीमध्ये असून 30 एप्रिलपर्यंत मार्गी राहणार आणि त्यानंतर वक्री होणार.


> या ग्रहाचा उदय झाल्यामुळे शनी-राहू खडाष्टक योग तयार करत आहेत. हे योग राजकीय दृष्टिकोनातून परिवर्तन आणि उलथा-पालथ करणारा मानला जातो.19 जानेवारीपासून 19 फेब्रुवारीपर्यंत राजकारणात परिवर्तनाचे योग आहेत. मार्चमध्ये पुन्हा परिस्थिती बदलेल. शनीचा प्रभाव कारखान्यांसाठी चांगला राहील. परिश्रम करणाऱ्या लोकांना लाभ होईल. रोजगाराच्या संधी वाढतील.

बातम्या आणखी आहेत...