आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि पूजेमध्ये लोखंडाच्या भांड्यांचा उपयोग करावा, शनि पूजेत तांब्याचे भांडे टाळावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थोड्याच दिवसांनी म्हणजे 23 जानेवारीला रात्री शनिदेव राशी परिवर्तन करत आहेत. हा ग्रह धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनिच्या राशी परिवर्तनाने कुंभ राशीला साडेसाती सुरु आणि वृश्चिक राशीची साडेसाती समाप्त होईल. वृषभ आणि कन्या राशीची ढय्या समाप्त होईल आणि मिथुन-तूळ राशीवर शनीची ढय्या सुरु होईल. शनीमुळे काही लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक शनिवारी शनि पूजन करावे. येथे जाणून घ्या, शनिदेवाची पूजा करताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

  • शनिदेवाची पूजा करताना तांब्याच्या भांड्याचा उपयोग करू नये, कारण तांब सूर्यदेवाचा धातू आहे. शनि आणि सूर्य एकमेकांचे शत्रू मानले जातात. शनि पूजेमध्ये लोखंडाच्या भांड्यांचा उपयोग करू नये. लोखंड किंवा मातीचा दिवा लावा. लोखंडाच्या भांड्यात तेल भरून शनिदेवाला अर्पण करावे.
  • लाल कपड्यात लाल फळ किंवा लाल फुल शनिदेवाला अर्पण करू नये, कारण लाल रंगाच्या गोष्टी मंगळ ग्रहाशी संबंधित आहेत. हा ग्रहसुद्धा शनीचा शत्रू ग्रह आहे. शनिदेवाच्या पूजेमध्ये काळ्या किंवा निळ्या रंगांचा उपयोग करणे शुभ राहते. शनिदेवाला निळे फुल अर्पण करावे.
  • शनिदेव पश्चिम दिशेचे स्वामी मानले गेले आहेत. यामुळे यांची पूजा करताना शनि मंत्रांचा जप करताना भक्ताचे मुख पश्चिम दिशेला असावे.
  • शनिदेवाच्या मूर्तीच्या एकदम समोर उभे राहून दर्शन घेऊ नये. या संदर्भात मान्यता आहे की, असे केल्याने शनीची दृष्टी थेट भक्तावर पडते.
  • अस्वच्छ अवस्थेत शनि पूजा करू नये. अस्वच्छ म्हणजे, स्नान न करता, उष्ट्या तोंडाने किंवा अस्वच्छ कपडे घालून पूजा करू नये.
  • शनिदेवाला काळे तीळ आणि उडीद अर्पण करावेत. या दोन्ही गोष्टी शनिदेवाला विशेष प्रिय आहेत. शनि पूजेमध्ये या सर्व गोष्टींकडे लक्ष दिल्यास सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...