Astrology / ग्रह स्थिती : मे 2019 मध्ये गुरू. शनि आणि राहू-केतू नाही बदलणार राशी, तर सूर्य 15 मे ला करणार या राशीत प्रवेश

कधी आणि कोणता ग्रह आपल्या राशीत करणार प्रवेश आणि कोणता ग्रह सोडणार तुमची राशी
 

दिव्य मराठी वेब टीम

May 01,2019 03:51:00 PM IST


रिलिजन डेस्क - 2019 वर्षातील पाचवा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात गुरू,. शनि आणि राहू-केतू व्यतिरिक्त इतर सर्व ग्रह राशी बदलणार आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं.मनीष शर्मा यांच्या मते, ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्वच राशींवर होतो. जाणून घ्या पंचांगानुसार मे 2019 मध्ये कोणता ग्रह केव्हा राशी बदलणार आहे.


मे महिन्यात अशी असेल ग्रहांची स्थिती

सूर्य
महिन्याच्या सुरुवातीला सूर्य मेष राशीमध्ये राहणार आहे. 15 मे रोजी दुपारनंतर सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.


चंद्र
1 मे रोजी चंद्र मीन राशीत असणार आहे. 3 मे रोजी मेष राशीत प्रवेश करेल. यानंतर दर अडीच दिवसांनी चंद्र राशी बदलणार आहे.


मंगल
मंगळ ग्रह मे महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत आहे. यानंतर 6 मे रोजी सायंकाळी मिथुन राशीत प्रवेश करेल.


बुध
महिन्याच्या सुरुवातीला बुध ग्रह मीन राशीत असणार आहे. 3 मे पर्यंत तो याच राशीत राहणार आहेत. 18 मे रोजी बुध वृषभ राशीत जाणार आहे.


गुरु
हा ग्रह सध्या वक्री असून वृश्चिक राशीत आहे.


शुक्र
शुक्र ग्रह सध्या मीन राशीत आहे. 10 मेच्या रात्री हा ग्रह मेष राशीत प्रवेश करेल.


शनि
शनि ग्रह देखील गुरू सारखा वक्री असून धनु राशीत आहे.

राहू-केतू
राहू ग्रह या महिन्यात मिथुन राशीत राहणार आहे आणि केतू धनु राशीमध्ये राहणार आहे.

X
COMMENT